Ajit Pawar : रस्ते विकासामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर ;अजित पवार यांचे प्रतिपादन

महाविकास आघाडी सरकाने रस्ते बांधणी प्रकल्पांकडे विशेष लक्ष दिले.
Ajit Pawar
Ajit Pawar sakal

माळेगाव : रस्ते विकासामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. अर्थात ही विकासाची घौडदौड सुरू ठेवण्यासाठी रस्ते विकासाला चालणा दिल्याशिवाय सर्वांगिण प्रगतीला वेग येणार  नाही, म्हणूनच आमच्या महाविकास आघाडी सरकाने रस्ते बांधणी प्रकल्पांकडे विशेष लक्ष दिले. कोठ्यावधीचा निधी खर्च केला, तर आम्ही मंजूर केलेली काही कामे सध्याला सुरू झाली आहेत. मात्र त्या कामांचा दर्जा उत्तम राहण्यासाठी आणखी प्रयत्न होणे गरजेचे वाटते, असे प्रतिपादन विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केले. यावेळी त्यांनी बारामतीमधील रस्ते स्वच्छ व सुस्थितीत करण्यासाठी मी अधिकाऱ्यांच्या मदतीने दिवाळीनंतर अधिकचे लक्ष घालणार असल्याचे सांगितले.

पणदरे (ता.बारामती) येथे ग्रीनफिल्ड अॅग्रीमेक इंडस्ट्रीज प्रा.लि.संचलित, ग्रीनफिल्ड  कृषी माॅलच्या उद्घाटन प्रसंगी विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते. यावेळी  ग्रीनफिल्ड अॅग्रीमेक इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकिय संचालक अभिजित घोरपडे, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संभाजी होळकर, विश्वास देवकाते, सचिन सातव, अशोकराव जगताप, राजेंद्र जगताप, करणसिंह जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, बारामतीच्या ग्रामीण भागातही रस्त्यांची कामे  पुर्णत्वाला आणण्यास पावसामुळे काहीशी अडचण आहे.

परंतु त्या कामांचा दर्जा पाहिजे तितका बरोबर नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे, असे सांगून पवार म्हणाले,`` शासनस्तरावर निधी एकदाच मिळतो. त्यामुळे त्यासंबंधी बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिवाळीनंतर सदरच्या कामांचा पाहिणी करून अहवाल द्यावा, त्यानंतर संबंधित ठेकेदारांविरुद्ध काय अॅक्शन घ्यायची ते मी घेतो,``असा इशाराही त्यांनी दिला.  ``शेती आणि शेती पुरक व्यवसायात अलिकडच्या काळात खुपच अधुनिकता आली आहे,खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना एकरी उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत.

त्यासाठी औषधे, बि-बियाणे, तणनाशके, विविध प्रकारची खते आदी आवश्यक त्या गोष्टी गावपातळीवर उपलब्ध होणे गरजेचे बनले आहे. अर्थात ती गरज ओळखून करणसिंह व त्यांच्या जगताप  कुटुंबियांनी ग्रीनफिल्ड  कृषी माॅलची उभारणी महत्वाची ठरते.`` असे मत पवार व्यक्त केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांनी, तर सूत्रसंचालन प्राध्यापक अनिल धुमाळ यांनी केले.

हरहुन्नरी कार्य़कर्त्याची पवारांना आठवण...!

पणदरे येथील हरहुन्नरी राष्ट्रवादीचे कार्य़कर्ते स्वर्गिय दिलीपराव जगताप यांच्या कार्य़कर्तुत्वाचा उल्लेख करीत अजित पवार यांनी त्यांची आठवण काढली. अचानकपणे अल्पशा आजाराने दिलीपराव गेले आणि माझा सुरवातीच्या राजकारणातील साथीदार एतक्या लवकर आपल्याला सोडून जाईल असे वाटले नव्हते. परंतु आज त्यांचा मुलगा करणसिंह जगताप हा नविन उभारलेल्या कृषी माॅलच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभा राहतो, याचा मला अभिमान वाटतो, असे गौरोउद्धगार अजित पवार यांनी काढले.त्यावेळी मात्र उपस्थितांचे मन अक्षरशः हेलावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com