काळदरी ते किकवी रस्ता गेला वाहून; जीव मुठीत धरून दुचाकीस्वारांना करावा लागतोय प्रवास

संतोष जंगम
Tuesday, 22 September 2020

काळदरी (ता. पुरंदर) वरून बांदलवाडी मार्गे किकवीला जाणारा रस्ता अनेक ठिकाणी वाहून गेला आहे. या रस्त्यावरून चारचाकी वाहनांची वाहतूक बंद झाली असून दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे भोर व पुरंदर तालुक्यातील बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी काळदरीचे माजी सरपंच अंकुश परखंडे व बहिरवाडीचे माजी सरपंच दशरथ जानकर यांनी केली आहे.

परिंचे (पुणे) : काळदरी (ता. पुरंदर) वरून बांदलवाडी मार्गे किकवीला जाणारा रस्ता अनेक ठिकाणी वाहून गेला आहे. या रस्त्यावरून चारचाकी वाहनांची वाहतूक बंद झाली असून दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे भोर व पुरंदर तालुक्यातील बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी काळदरीचे माजी सरपंच अंकुश परखंडे व बहिरवाडीचे माजी सरपंच दशरथ जानकर यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काळदरी खोऱ्यातून बंगळूरू महामार्गाला जोडणार हा सर्वात कमी अंतराचा रस्ता आहे. परिसरातील दोनशे ते तीनशे तरुण शिरवळ येथील एमआयडीसीमध्ये रोज याच रस्त्यावरून कामासाठी जातात. मोरवाडी परिसरातील घाटामध्ये अनेक ठिकाणी रस्ता वाहून गेला आहे. घाटात कुठेही संरक्षण भिंती नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. रोज एक तरी दुचाकीस्वाराचा या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे घडत असल्याचे दशरथ जानकर यांनी सांगितले. बांदलवाडी, रामवाडी, कोंडकेवाडी तसेच पुरंदर किल्ल्याच्या डोंगर माथ्यावर रहाणार धनगर समाज या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करत असून रात्रीच्या वेळी आजारी रुग्णांना घेऊन जाताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे येथील रहिवासी स्वागत कोंढाळकर यांनी सांगितले.

ऑनलाइन शाळेसाठी पालक आग्रही; मात्र शाळांचा नकार

काळदरी परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात दूधाचा व्यवसाय करत असून पुणे शहराला दूध पुरवठा करण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. रस्ता वाहून गेल्याने तीस किलोमीटर लांब अंतरावरून वाहतूक करावी लागत आहे. अनेक वर्षांपासून बांदलवाडी- किकवी रस्ता दुरुस्तीची मागणी ग्रामस्थ करत असून या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे अंकुश परखंडे यांनी सांगितल. गेल्या दहा वर्षात भोर तालुका बांधकाम विभागाने या रस्त्याची कसलीही दुरुस्ती केली नसल्याचे परखंडे म्हणाले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The road from Kaladari to Kikvi is in bad condition due to rains