लोणी काळभोरमध्ये 'रस्ता सुरक्षा' मोहीम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

लोणी काळभोर : २९ व्या राष्ट्रीय रस्ता सुरुक्षा अभियानांतर्गत लोणी काळभोर (ता. हवेली) पोलिस ठाण्याच्या हद्दीत 'रस्ता सुरक्षा' मोहीम राबविणे सुरु आहे. या मोहिमेत वाहनचालकांची नेत्र तपासणी, वाहनांना रिफ्लेक्टर लावणे, ध्वनिप्रदूषण रोखणे, फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाई, विनापरवाना वाहनचालकांवर कारवाई मोहीम, ओव्हरलोड गाड्यांवर कारवाई व गाड्यांच्या फिल्मिंगची तपासणी, सीटबेल्ट तपासणी, हेल्मेट तपासणी, गाड्यांचे प्रदूषण नियंत्रण (पीयूसी) तपासणी केली जात आहे.

हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड व पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोंडूभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली २३ एप्रिल २०१८ ते ५ मे २०१८ या काळात सुरु असलेल्या रस्ता सुरक्षा मोहिमेची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, वाहतूक पोलीस कर्मचारी मारुती पासलकर, सागर कडू, बीट मार्शल रवींद्र गोसावी, संदीप देवकर, दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचारी पार पडत आहेत.

यावेळी शिवाजी ननवरे म्हणाले,"रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रत्येक वाहनचालकाने केवळ रस्ता सुरक्षा मोहिमेपुरते मर्यादित न राहता नेहमी वाहतुकीच्या नियमांचे कायम पालन करणे गरजेचे आहे. रस्ते सुरक्षेबाबत जाणीव जनजागृती झाल्यास रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होईल तसेच अपघातांमुळे होणारी जिवितहानी, वाहनांचे नुकसान, राष्ट्रीय संपत्तीची हानी टाळता येईल. त्यामुळे सर्वांनी रस्ता सुरक्षेला प्राधान्य द्यावे."

Web Title: Road Safety movement in Loni Kalbhor