esakal | रस्त्यावर गाण्यांची भुरळ घालणारा अवलिया बंगाली बाबू कमल शेख
sakal

बोलून बातमी शोधा

singer

रस्त्यावर गाण्यांची भुरळ घालणारा अवलिया बंगाली बाबू कमल शेख

sakal_logo
By
मोहिनी मोहिते

कॅन्टोन्मेंट : महंमद रफी, येशूदास, किशोर कुमार, कुमार सानू यांची लोकप्रिय गाणी म्हणत रेल्वे प्रवासात, एसटी आणि रेल्वे स्थानक, गर्दीच्या ठिकाणी, रस्तोरस्ती मनोरंजन करण्याचे छंद कमल शेख या बंगाली बाबूने जपला आहे. कोरोना महामारीचे सावट असले, तरी सावधगिरी बाळगत गणेशोत्सव सुरू आहे. त्यातच गणेशभक्तांनाही सुमधूर गाणी ऐकविण्याचे काम ते करीत आहेत. त्यांच्या आवाजाची धून ऐकून अनेकांकडून वन्स मोअरची हाक दिली जात असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

कमल शेख (वय , रा. कोंढवा, मूळ- पश्चिम बंगाल) असे अवलियाचे नाव आहे. रविवारी (दि. १२ सप्टेंबर २०२१) क्वार्टर गेट रस्त्यावर गाणी म्हणताना अनेकांनी वाहवाह मिळविल्याचा अनोखा क्षण अनकांनी अनुभवला.

हेही वाचा: प्रथमच मिळालेल्या स्पोर्ट गणवेशाने हरखुन गेली आदिवासी बालके

अवलिया गायक शेख यांचे गाणे ऐकून नवतरुणांबरोबर ज्येष्ठांनाही जागेवर थांबण्याची इच्छा होतआहे. आज (रविवार, दि. १२ सप्टेंबर २०२१) नाना पेठेकडून कॅम्पमध्ये जाणाऱ्या रस्त्याकडे या अवलियाचे गाणे ऐकण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले की, माझ्या आजोबांना गाण्याची आवड होती, तीच परंपरा काहीशी मी सुरू ठेवली आहे. मला चित्रपटामध्ये गायनामध्ये करिअर करायचे होते. मात्र, चित्रपटात जाण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे मागिल पंधरा वर्षांपासून महंमद रफी, येशूदास, किशोर कुमार आणि कुमार सानू यांची गाणी रस्तो रस्ती म्हणत आहे. गायनप्रेमींकडून दररोज ४००-५०० रुपयांची बिदागी मिळते. त्यातूनच पोटपूजा करीत जीवनक्रम सुरू आहे.

loading image
go to top