बारामतीत रस्त्यावरील खडीने जातोय गाड्यांचा तोल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

शहरातील भिगवण रस्त्यावरील डांबरीकरणाचे काम पूर्ण होऊन महिना उलटून गेला तरी या रस्त्यावर पडलेली बारिक खडी तशीच आहे. यावरुन घसरुन दुचाकीस्वार पडत आहेत.

बारामती शहर - शहरातील भिगवण रस्त्यावरील डांबरीकरणाचे काम पूर्ण होऊन महिना उलटून गेला तरी या रस्त्यावर पडलेली बारिक खडी तशीच आहे. यावरुन घसरुन दुचाकीस्वार पडत आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला त्याचे फारसे सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे.

भिगवण रस्त्याचे तीन हत्ती चौकापासून ते डायनामिक्स टोल नाक्यापर्यंत डांबरीकरण झाले. या डांबरीकरणानंतर रस्त्यावर जी बारीक खडी टाकलेली असते. ती पावसाने व वाहतूकीने रस्त्याच्या कडेला गेलेली आहे. मात्र कडेला गेलेल्या या बारिक खडीवरुन अनेक दुचाकीस्वार ब्रेक मारल्यावर घसरुन पडत आहेत. अंदाज न आल्याने घसरुन पडणाऱ्यांचे प्रमाण यात अधिक आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या. मात्र अशी खडी पडलेलीच नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. याबाबत अधिकाऱ्यांना काही जागरुक नागरिकांनी फोटो पाठविल्यानंतर त्यांनी ही खडी उचलण्याबाबत कार्यवाही करतो अशी ग्वाही दिली आहे. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Road work in Baramati has not been properly organized