बिबवेवाडीत रोडरोमिओंचा धुमाकूळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

बिबवेवाडी - गावठाणासह परिसरातील शाळांमध्ये रोडरोमिओंचा धुमाकूळ वाढला आहे. त्यांच्यावर कोणाचाही धाक उरलेला नसून, रस्त्यावर गोंधळ सुरू असतो. त्याचा विद्यार्थिनींना त्रास होत असून, रस्त्यावरील रहदारीला अडथळा येत आहे. स्वामी विवेकानंद मार्गावर गावठाण चौकात महापालिकेच्या शाळांसह एकूण सहा शाळा असून, पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत; मात्र रोडरोमिओ व शाळांमधील धूमस्टाइल वाहनचालकांचा विद्यार्थिनींना त्रास होत आहे; परंतु पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत. 

स्वामी विवेकानंद मार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने गावठाण चौकातील एकाच रस्त्यावरून रहदारी सुरू आहे. त्यातच रोडरोमिओ व शालेय विद्यार्थी राइडिंग करत असल्यामुळे रहदारीला अडथळा येऊन वाहतूक कोंडी होते. 

नागरिकांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्यास ते नागरिकांच्या अंगावरच धावून जाऊन दहशत निर्माण करतात. शाळांमध्ये पोलिसांच्या डायऱ्या ठवलेल्या आहेत; परंतु शाळेबाहेर रस्त्यावर आल्यावर विद्यार्थिनींना होणाऱ्या त्रासाबद्दल कोणीही जबाबदारी घेण्यास तयार नाही. शाळा भरतेवेळी आणि सुटतेवेळी महिला पोलिसांची गस्त व वाहतूक पोलिसांनी गाड्या चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांवर व त्यांच्या पालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

शाळा परिसरातील रोडरोमिओंवर पोलिस वेळीवेळी कारवाई करत आहेत. तरीही रस्त्यावर असे प्रकार आढळून आल्यास कारवाई करू.
- राजेंद्र जाधव, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा 

Web Title: Roadromio Police Bibavewadi