
मांडवगण फराटा - वडगांव रासाई (ता. शिरूर) दरम्यान नागरगाव रस्त्यावरील कुरणात दुचाकीवरून येऊन सराफाला लुटणाऱ्या पाच आरोपींपैकी एका आरोपीला शिरूर पोलिसांनी अवघ्या बारा तासांत गजाआड केले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस आणि शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.
याबाबत दिलेल्या माहितीनुसार दि.२५ रोजी सायंकाळी उरुळी कांचन येथील सराफ जयंतीलाल ओसवाल हे सोन्याचे दागिने घेऊन काष्टी येथील काम आटोपून माघारी तांदळी नागरगाव रोड ने जात असताना कुरणात आले असता पाच आरोपींनी फिर्यादी ओसवाल यांना दुचाकीवरून खाली पाडून जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील सोन्याचे सुमारे २०० ग्रॅम वजनाचे ९ लाख २० हजार रुपयांचे दागिने लुटून नेले होते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
याबाबत फिर्यादी यांनी तातडीने पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार योगेश गुंड, प्रशांत खुटेमाटे, विलास कोथळकर यांनी घटनास्थळी तसेच परिसरात मिळून आलेल्या पुराव्यांच्या आधारे गुन्ह्यातील संशयित आरोपी योगेश पालकर (रा. तांदळी, ता. शिरूर) यास ताब्यात घेतले. यावेळी आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात पोलीसांनी वेगाने तपास करत शिरूर व मांडवगण फराटा पोलीसांच्या तपास पथकाने १२ तासाच्या आत अटक केली असून उर्वरित आरोपींना लवकरच अटक केली जाईल असे पोलीसांनी सांगितले.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.