सदनिका फोडण्याचे सत्र तिसऱ्या दिवशाही सुरूच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

पुणे - शहराच्या वेगवेगळ्या भागांत सोसायट्यांमधील सदनिका फोडण्याचे सत्र सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. धायरीतील तीन आणि हडपसरमधील एक सदनिका सोमवारी चोरट्यांनी फोडून 19 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 45 हजार रुपयांचे सोने लंपास नेले. दरम्यान, शहरात सगळीकडे चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असतानाही पोलिस यंत्रणा मात्र ढिम्म असल्याची सद्यःस्थिती आहे. 

मागील आठवडाभरापासून शहराच्या मध्यवर्ती भागापासून ते उपनगरांमध्ये घरफोडीच्या घटना घडत आहेत. विशेषतः हडपसर, कात्रज, आंबेगाव, धायरीसह मध्यवर्ती भागातही घरफोड्यांचे सत्र सुरू आहे. सोमवारी धायरीतील रायकर मळ्यामध्ये असलेल्या शिवमल्हार पार्क सोसायटीमधील चार सदनिका चोरट्यांनी फोडल्या. याप्रकरणी दत्तात्रय संकपाळ (वय 56) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

संकपाळ हे महापालिकेमध्ये कामाला आहेत. घरी कुलूप लावून ते कामाला गेले होते. दुपारी घरी परतल्यानंतर त्यांना सदनिका फोडल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी सिंहगड पोलिस ठाण्याच्या पोलिसांना माहिती दिली. पोलिसांकडून मुद्देमालाची माहिती घेण्याबरोबर अन्य आवश्‍यक माहिती गोळा केली. दरम्यान, हडपसर येथीलही एक सदनिका चोरट्यांनी फोडली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रकिया सुरू होती. 

Web Title: robbery case pune