मार्केटयार्डात वाहनचालकांची वारणारांकडून लूट; दि पूना मर्चंट्‌स चेंबरचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 October 2020

गूळ भुसार बाजारात माल घेऊन येणाऱ्या वाहनचालकांची वारणार कामगार दादागिरी व अडवणूक करून लूट करत आहेत. वारणार वाराई व हमाली दुप्पट, तिप्पट दराने घेत असल्याचा आरोप दि पूना मर्चंट्‌स चेंबरने केला आहे. हमाल कामगारांची संख्या वाढवून वाराईचे काम दुकानांतील सर्व हमालांना देण्याची मागणी चेंबरने पणन संचालक आणि बाजार समितीकडे केली आहे. 

मार्केट यार्ड (पुणे) : गूळ भुसार बाजारात माल घेऊन येणाऱ्या वाहनचालकांची वारणार कामगार दादागिरी व अडवणूक करून लूट करत आहेत. वारणार वाराई व हमाली दुप्पट, तिप्पट दराने घेत असल्याचा आरोप दि पूना मर्चंट्‌स चेंबरने केला आहे. हमाल कामगारांची संख्या वाढवून वाराईचे काम दुकानांतील सर्व हमालांना देण्याची मागणी चेंबरने पणन संचालक आणि बाजार समितीकडे केली आहे. 

राज्य शिक्षक सेनेच्या समन्वयकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल​

मार्केट यार्ड गूळ भुसार विभागात दिवसेंदिवस डमी वारणार वाढत आहेत. तसेच जे वारणार आहेत ते अवाजवी वाराई घेत आहेत. हमाल कामगारांमध्ये वाराई करणाऱ्या हमालांच्याबाबतीत तक्रारींचे प्रमाण जास्त आहे. बाजारात वाराईचे काम करणाऱ्या हमाल कामगारांना अडते आणि व्यापारी यांच्या दुकानांत काम करणाऱ्या हमाल कामगारांपेक्षा खूप जास्त पैसे मिळतात, ही वस्तुस्थिती आहे, असे चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले. बाजारात सध्या कामगार लावून काम करणे, करारातील दरांपेक्षा जास्त वाराई घेणे, यावर अनेकदा चर्चा झाल्या आहेत; परंतु याला कोठेही पायबंद बसलेला नाही. आज दुकानांमध्ये काम करण्यासाठी हमाल मिळत नाहीत, अशी स्थिती आहे, असे चेंबरने दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

अन्नदात्या, आता पर्याय नाही; बदलावी लागणार 'पीक'पद्धत!​

गाडी (टनांत) - हमाल पंचायत दर - वारणार घेत असलेली रक्कम 
10 टन - 676 - 1000-1200 
25 टन - 2125 - 3500-400 
5 टन - 800 -1600 

 

वारणार गाडी 2 -4 तासांत खाली करतो. तो कमी वेळ आणि कमी परिश्रमात चार हजार कमवतो, तर दुसरीकडे दुकानातील हमालाला दिवसभर कष्ट करून एक हजार रुपयेही मिळत नाहीत. वारणार हा डमी वारणारांकडून काम करून घेऊन त्यांना 400 ते 500 देतो. 
- विजय मुथा, सचिव, दि पूना मर्चंट्‌स चेंबर 

व्यापारी आणि हमाल पंचायतीची समन्वय समिती आहे. तेथे तक्रार आली तर आम्ही ताबडतोब कारवाई करतो. वारणार जास्त पैसे घेत नाहीत. तसा पुरावा सादर केला तर आम्ही ताबडतोब कारवाई करू. 
- गोरख मेंगडे, सरचिटणीस, हमाल पंचायत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery of motorists in the market yard