एक्‍स्प्रेसवर दरोड्याचा प्रयत्न

Mumbai-Kanyakumari-Express
Mumbai-Kanyakumari-Express

पुणे - दौंड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-कन्याकुमारी एक्‍स्प्रेसमधील महिलांच्या बोगीवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने टोळीतील तिघांना अटक केली. त्यांच्याकडून कोयता, लोखंडी सळई, मिरची पूड, २५ मोबाईलसह सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, अन्य तीन जण पोलिसांच्या ताब्यातून पळून गेले.

ओंकार राजू खरात (वय १९, रा. बारामती), रोहित शंकर पाटील (वय २०, रा. पिंपळे गुरव) व कुमार सुभाष खंडागळे (वय ३१, रा. दहिफळ, उस्मानाबाद) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर अंकुश पवार, गफ्फार शेख व मुकेश ऊर्फ बिहारी हे तिघे फरार झाले आहेत. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड रेल्वे स्थानकाच्या पुण्याकडील बाजूला असलेल्या स्लिपर फॅक्‍टरीजवळील ब्रिजजवळून जाणाऱ्या मुंबई-कन्याकुमारी एक्‍स्प्रेसवर दरोडा टाकण्यासाठी पाच ते सहा जणांची टोळी येणार असल्याची खबर पोलिस निरीक्षक मौला सय्यद यांना मिळाली होती.

त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने उड्डाण पुलाजवळ सापळा लावला. त्याचवेळी एक्‍स्प्रेस तेथून हळूहळू जात असताना महिलांच्या बोगीमध्ये सहा जणांनी प्रवेश केला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेऊन तिघांना पकडले. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन तीन जणांनी तेथून धूम ठोकली.

दरम्यान, ओंकार खरात याच्यावर दौंड पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. लोहमार्ग पोलिस अधीक्षक दीपक साकोरे, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी जगदीश सावंत, अनिल दांगट, सुनील कदम, सुरेश रासकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com