...म्हणून सेंट जोसेफ स्कूलच्या विरोधात खडकीत करण्यात आले आंदोलन 

हरिश शर्मा
Friday, 16 October 2020

सेंट जोसेफ गर्ल्स या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात भारतीय रिपब्लिकन फेडरेशनच्या वतीने शाळेवर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. 

खडकी बाजार (पुणे) : येथील सेंट जोसेफ गर्ल्स या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात भारतीय रिपब्लिकन फेडरेशनच्या वतीने शाळेवर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. 

सुनेनं बळकावलेल्या घराचा ताबा मिळाला सासूला; घटस्फोटानंतरही राहत होती घरात​

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी शाळा प्रशासनाकडून सक्ती करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शाळेचे गणवेश नेमून दिलेल्या दुकानातूनच खरेदी करण्यास भाग पाडत आहे, शाळेच्या आर्थिक फायद्यासाठी पुस्तकांची विक्री ठराविक दुकानातून खरेदी करण्याची सक्ती घालण्यात येत आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पंचवीस टक्के आरक्षण असूनही प्रवेश दिला जात नाही, शाळेपासून तीन किलोमीटर अंतरातील विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश प्राधान्य देणे नियमानुसार असतानाही दहा ते पंधरा किलोमीटर लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो, शाळेच्या या सर्व मनमानी कारभाराविरोधात आंदोलन करण्यात आल्याचे फेडरेशनचे पुणे जिल्हाध्यक्ष फिरोज खान यांनी सांगितले 

उपमुख्यमंत्र्यांचा पुणे महापालिकेवर हल्लाबोल; शहरातील परिस्थितीबाबत ठरवले जबाबदार! 

शाळेच्या विरोधात जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. फेडरेशनचे राष्ट्रीय महासचिव माऊली सोनवणे, प्रदेश महासचिव मदन कोठुळे, उपाध्यक्ष फरीद शेख, रवींद्र सिंग, दीपक माने, आशिष जाधव, समाधान गायकवाड, शक्ती चांडालिया, विश्वनाथ सरोदे, थॉमस जोसेफ, रवींद्र लंकेश्वर आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A rocky outcry against the arbitrariness of St. Joseph's School