...अन्‌ माझा प्रस्ताव स्वीकारला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

‘माझे पहिली ते अकरावीपर्यंतचे शिक्षण हुजुरपागेत झाले. मी १९६४ दरम्यान दहावीत शिकत असताना ‘विद्यार्थ्यांना शाळेत कोणते बदल हवेत,’ असा अर्ज भरून घेण्यात आला. मी ‘पाचवीपासून शास्त्र शिकविले जावे आणि प्रयोगशाळा अजून सुधारायला हव्यात’, असे लिहून दिले.

पुणे - ‘माझे पहिली ते अकरावीपर्यंतचे शिक्षण हुजुरपागेत झाले. मी १९६४ दरम्यान दहावीत शिकत असताना ‘विद्यार्थ्यांना शाळेत कोणते बदल हवेत,’ असा अर्ज भरून घेण्यात आला. मी ‘पाचवीपासून शास्त्र शिकविले जावे आणि प्रयोगशाळा अजून सुधारायला हव्यात’, असे लिहून दिले. मला मुख्याध्यापिकेने बोलावून घेतले. मला काय म्हणायचे आहे ते समजून घेतले आणि तसे बदल शाळेत केले,’ असा हृदयस्पर्शी अनुभव शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि फ्रेंच नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कार प्राप्त भौतिकशास्त्रज्ञ प्रा. रोहिणी गोडबोले यांनी सांगितला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

फ्रान्स सरकारचा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त प्रा. गोडबोले यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला. बंगळूर येथील भारतीय विज्ञान संस्थेत (आयआयएससी) सन्माननीय प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. गोडबोले यांचे शिक्षण हुजुरपागेत आणि सर परशुराम महाविद्यालयात झाले. विज्ञानाची आवड कशी लागली हे सांगताना त्या म्हणतात, ‘‘हुजुरपागेत तेव्हा सातवीपासून सामान्यशास्त्र शिकविले जात होते. त्या काळात मॅट्रिक स्कॉलपशिपची परीक्षा चौथी आणि सातवीला असायची. राज्यात दहा लोकांना ही स्कॉलरशिप दिली जात होती. आमच्या शाळेतील कोणीही त्या परीक्षेत निवडलेच जात नव्हते.

Serum Institute Fire:सीरमच्या आगीनंतर संभाजी ब्रिगेडचं पत्रक; 5 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

कारण आम्हाला सातवीपर्यंत शास्त्रच शिकविले जात नव्हते. आमच्या शिक्षिकेने माझ्यातील गणिताची आवड ओळखली आणि त्यांच्या पतीला मला शाळा सुटल्यावर शनिवारी आणि रविवारी शास्त्र शिकविण्यास सांगितले. त्या परीक्षेत मी स्कॉलरशिपही पटकावली.’’ केवळ शास्त्र येत नाही म्हणून स्पर्धापरिक्षेत मुलींनी मागे पडू नयेत. यासाठी विज्ञानाचा आग्रह प्रा. गोडबोले यांनी तेव्हापासून धरला होता. मुलींच्या शाळेतही विज्ञान शिकविले जावे म्हणून त्यांनी हे दोन प्रस्ताव शाळेला दिले होते. प्रा. गोडबोले यांचे कणभौतिकशास्त्रात जागतिक स्तरावर मोठे योगदान असून, फ्रान्स सोबत सहकार्य करत त्यांनी केलेल्या आजवरच्या भरीव संशोधनाबद्दल त्यांना तेथील सरकारने हा सर्वोच्च सन्मान नुकताच दिला आहे.

Serum Institute Fire: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohini Godbole Proposal School Student Changes