esakal | रोहित पवार, तटकरेंचे पद जाणार; होणार निवडणूक
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar

पुणे जिल्ह्यातील रोहित पवार हे बारामती तालुक्यातील शिर्सुफळ-गुणवडी या गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. पवार हे नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत.

रोहित पवार, तटकरेंचे पद जाणार; होणार निवडणूक

sakal_logo
By
गजेंद्र बडे

पुणे : राज्यातील पंचायतराज संस्थाचे सदस्य असलेल्या आणि नुकत्याच विधानसभा निवडणुकीत आमदारपदी निवडून आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व संपुष्टात आले आहे. यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, बीड जिल्हा परिषदेतील सदस्य संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे आदींसह अनेकांचा समावेश आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

दरम्यान, या जागा रिक्त झाल्याचे संबंधित जिल्हा परिषदांनी आपापल्या जिल्हाधिकार्यांना पत्राद्वारे कळवले आहे. यानुसार पुणे जिल्हा परिषदेनेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना कळविले आहे.

नकटं असावं पण, धाकटं असू नये, शिवसेनेला प्रत्यय

पंचायतराज संस्थांमधून विधानसभेवर निवडून गेलेल्या जिल्हा परिषद सदस्यांचे सदस्यत्व १९६१ मधील जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील कलम ४१ नुसार तर, पंचायत समिती सदस्याचे सदस्यत्व याच कायद्यातील कलम ५८ (१इ) नुसार आपोआप संपुष्टात येते. मात्र यासाठी संबंधित सदस्यांचे आमदारपदी निवडून आल्याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध होणे अनिवार्य आहे. याबाबत राज्याच्या ग्रामविकास विभागानेही ३० मार्च १९९५ मध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविलेले आहे.

रस्ते की परवाह करुंगा तो... : संजय राऊत 

दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदारपदी निवडून आलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध झाली आहेत. त्यामुळे या सर्वांचे पंचायतराज संस्थांवरील सदस्यत्व आपोआप संपुष्टात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील रोहित पवार हे बारामती तालुक्यातील शिर्सुफळ-गुणवडी या गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. पवार हे नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत.

loading image