...अन् सुकर झाली हृदयशस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

बारामती - खंडोबानगर येथील वसंत तुकाराम बागाव यांचा केरसुणी बनविण्याचा व्यवसाय. हातावरचे पोट असलेल्या बागाव यांना छातीमध्ये दुखू लागले. तातडीची शस्त्रक्रिया करावी लागेल असे डॉक्‍टरांनी सांगितले. रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अभियानाची मदत मागितली आणि बागाव यांच्या हृदयावरील शस्त्रक्रिया सुकर झाली. 

जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या अनंत आरोग्य अभियान व कै. रा. तु. भोईटे आरोग्य प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी शिबिर सुरू आहे.

यामध्ये रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन मागील वर्षीपासून सुरू केलेल्या या अभियानात अँजिओग्राफीसाठी रुग्णांना आर्थिक मदत केली जाते, तर त्याला जोडून शासकीय योजनेतून अँजिओप्लास्टी मोफत होत असल्याने रुग्णांचा एरवी होणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाचतो. शस्त्रक्रियापूर्व तपासण्या सुलभ होत असल्याने रुग्णांना दिलासा मिळतो. यातून बुधवारी (ता. १९) १०६वी हृदयशस्त्रक्रिया बागाव यांची पार पडली. त्यांच्यासह इतरही रुग्णांशी रोहित पवार यांनी संवाद साधून विचारपूस केली. त्या वेळी केरसुणीच्या व्यवसायातून एवढा खर्च कसा पेलवला असता असे सांगत बागाव यांनी पवार यांचे आभार मानले. 

बागाव यांना मागील एका महिन्यापासून दम लागत होता. छातीत अधिकच दुखू लागल्याने सरकारी व खासगी दवाखान्यांमध्ये दाखविले. मात्र त्रास काही कमी होत नव्हता. बारामतीतील डॉ. अंजली खाडे यांनी त्यांची तपासणी करून त्यांना अँजिओग्राफीचा सल्ला दिला. त्याकरिता रोहित पवार व डॉ. रमेश भोईटे यांनी सुरू केलेल्या अभियानाची माहिती दिली. त्यानुसार बागाव दवाखान्यात दाखल झाले, तिथे त्यांना रक्तवाहिनीत ९५ टक्के ब्लॉक असल्याची माहिती मिळाली. ५८ वर्षीय बागाव यांची लागलीच हृदयशस्त्रक्रिया झाली.

१ जानेवारीपर्यंत शिबिर सुरू राहणार
या शिबिरात पुणे, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, नगर जिल्ह्यासह बीड व जळगाव जिल्ह्यांतील रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या. अँजिओग्राफीच्या रुग्णांची संख्या २७६ वर पोचली आहे. अजूनही रुग्ण येत असल्याने रुग्ण व नातेवाइकांच्या आग्रहामुळे १२ डिसेंबरपर्यंतच असलेले हे शिबिर येत्या १ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. 

Web Title: Rohit Pawar Heart Surgery