देशबांधणीतही नौदलाची भूमिका महत्त्वाची - रामनाथ कोविंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

‘देशाचा ९० टक्के जागतिक व्यापार हा समुद्राच्या माध्यमातून होतो. भारतीय नौदलाचे महत्त्व केवळ देशाच्या सुरक्षेशी संबंधित नसून, देशबांधणीच्या दृष्टीने आर्थिक सुरक्षेसाठीसुद्धा आहे. त्यासाठी आशिया-प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर क्षेत्रात दक्षता बाळगण्याची गरज आहे,’’ असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले.

पुणे - ‘देशाचा ९० टक्के जागतिक व्यापार हा समुद्राच्या माध्यमातून होतो. भारतीय नौदलाचे महत्त्व केवळ देशाच्या सुरक्षेशी संबंधित नसून, देशबांधणीच्या दृष्टीने आर्थिक सुरक्षेसाठीसुद्धा आहे. त्यासाठी आशिया-प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर क्षेत्रात दक्षता बाळगण्याची गरज आहे,’ असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोणावळा येथील भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस शिवाजी’ या अभियांत्रिकी प्रशिक्षण संस्थेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त गुरुवारी (ता. १३) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रपती ध्वज’ (प्रेसिडेंट कलर) प्रदान करण्यात आला. या वेळी संस्थेतील प्रशिक्षणार्थी आणि अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना मानवंदना दिली. 

समारंभास राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी, नौदलप्रमुख ॲडमिरल करमबीर सिंग, नौदलाच्या दक्षिण विभागाचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल अनिलकुमार चावला उपस्थित होते.

सविताभाभी...तू इथंच थांब! पुण्यातील होर्डिंगची चर्चा

कोविंद म्हणाले, ‘‘सामुद्री सीमांची सुरक्षा ही अर्थव्यवस्थेशी निगडित बाब आहे. सामुद्री सीमा आणि व्यापार मार्ग सुरक्षितपणे राखणे, तसेच सागरी घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणे, यात नौदलाची भूमिका मोलाची आहे आणि देशाला नौदलाच्या या धाडसी कार्याचा अभिमान आहे.’’  आगामी काळात आण्विक, संकरित (हायब्रीड) आणि विद्युत यासारख्या तंत्रज्ञानामध्ये बदल होणार असून, आपण सक्षम असणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

युद्धात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
भविष्यात युद्धासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होणार असून, अशा प्रकारच्या आव्हानाच्या दृष्टीने ‘आयएनएस शिवाजी’मध्ये सागरी अभियंता तयार व्हावेत. यासाठी ही संस्था प्रशिक्षण देईल, असा विश्वास राष्ट्रपती कोविंद यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The role of the Navy is important in the formation of the country