esakal | चार्टर्ड अकाउंटंटची भूमिका आता 'बिझनेस सोल्युशन प्रोव्हायडर'शी I Chartered Accountant
sakal

बोलून बातमी शोधा

chartered accountant

चार्टर्ड अकाउंटंटची भूमिका आता 'बिझनेस सोल्युशन प्रोव्हायडर'शी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - 'चार्टर्ड अकाउंटंट हा सध्या केवळ लेखापरिक्षक न राहता 'बिझनेस सोल्युशन प्रोव्हायडर' असून, त्यांना आता नागरी सहकारी बँकांचे आरोग्य सुधारणारे डॉक्टर, वकील, इंजिनिअर आणि आर्किटेक्ट या सर्वांची भूमिका पार पाडावी लागते," असे प्रतिपादन चार्टर्ड अकाऊंटंट-कोऑपरेटिव्ह बँकर्स (सीए-सीओबी) या संस्थेचे उपाध्यक्ष सीए एस. बी. झावरे यांनी केले.

'सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने आयोजित सहकार महापरिषदेत ते बोलत होते.

सीए झावरे म्हणाले, 'सीए-सीओबी' ही संस्था नागरी सहकारी बँकांशी सुसंवाद साधून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तयार केलेले व्यासपीठ आहे. चार्टर्ड अकाऊंटंटना केवळ लेखापरीक्षक न राहता नागरी सहकारी बँकांचे आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी डॉक्टर, इंजिनिअर, वकील आणि आर्किटेक्ट या सर्वांची भूमिका पार पाडावी लागते. ज्या छोट्या नागरी बँकांकडे चार्टर्ड अकाऊंटंट नाहीत त्यांना त्यांच्याकडील अधिकाऱ्यांना संस्थेकडून मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच, या बँकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सीए- सीओबी संस्था प्रयत्नशील राहील.

हेही वाचा: लिहिता न येणाऱ्या बायकांनी उभी केली २०० कोटींची बँक

सीए-सीओबीचे तथा कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलींद काळे म्हणाले, सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या नागरी सहकारी बँकांना विविध आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. त्यांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी आणि त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन करण्यासाठी चार्टर्ड अकाऊंटंट - कोऑपरेटिव्ह बँकर्स (सीए-सीओबी) संस्था प्रयत्नशील राहील.

बँकिंग नियमन कायद्यातील सुधारणांमुळे नागरी सहकारी बँकांना नवीन अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी 'सीए-सीओबी' हा पर्याय ठरेल. ज्या नागरी बँकाकडे चार्टर्ड अकाऊंट नाहीत. त्यांना या संस्थेकडून संपूर्ण सहकार्य करण्याची भूमिका राहील. त्यामुळे सहकार चळवळ पुढे नेण्यास मदत होईल.

loading image
go to top