esakal | लवळे येथील रोटमलनाथ यात्रा रद्द

बोलून बातमी शोधा

लवळे येथील रोटमलनाथ यात्रा रद्द
लवळे येथील रोटमलनाथ यात्रा रद्द
sakal_logo
By
धोंडिबा कुंभार

पुणे : लवळे (ता.मुळशी) येथील ग्रामदैवत रोटमलनाथ व भैरवनाथ जोगेश्वरीची यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती सरपंच नीलेश गावडे यांनी दिली. उद्या (ता.३) कालाष्टमी तिथीनुसार भरविण्यात येणारी यावर्षीची येथील यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केली आहे. त्याबाबतचे निवेदन ग्रामपंचायतीने रोटमलनाथ उत्सव समितीला नुकतेच दिले आहे.

गणेश शितोळे यांनी सांगितले की , येथील रोटमलनाथ यात्रोत्सव दरवर्षी चैत्र कृष्ण कालाष्टमीला भरविण्यात येत असतो. यात्रेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात. कि लाकार तसेच ढोललेझीम पथके उपस्थित राहून आपली कला सादर करीत असतात.

हेही वाचा: शाहिद मीराने हाती घेतली मोहिम; कोरोना संकटात मदतीचे आवाहन

अनेक भाविक नवस फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत असतात. यावर्षी हा उत्सव सोमवारी(ता.३) आलेला आहे. मात्र यावर्षी कोरोना महामारीची लाट असल्याने येथील यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उद्या येथील रोटमलनाथ मंदिरात नित्याची पूजा झाल्यानंतर प्रवेशद्वाराला कुलूप लावून ते बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी व भाविकांनी यात्रेसाठी येऊ नये.

हेही वाचा: आचरणातून आदर्श विचार

ग्रामपंचायतीचे उपसरपंच रंजित राऊत , माजी सरपंच संजय सातव व ग्रामविकास अधिकारी विठ्ठल साकोरे यांनी सांगितले की , ग्रामपंचायतीने मासिक सभेत ठराव करून ही यात्रा रद्द केली आहे. त्यानुसार , नागरिक , ग्रामस्थ व भाविकांना न येण्याचे आवाहनही केलेले आहे. भाविक , पाहुणे मंडळी तसेच मित्र परिवाला यात्रेनिमित्त स्वतःचे घरी किंवा गावात बोलावू नये. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे शासन स्तरावरून घालून दिलेले नियमांचे उल्ल्ंघन करणारांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल.