आरपीआय भाजपसोबतच काम करणार- थुलकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे बोलणे झाले आहे. काही कारणांमुळे दोन्ही पक्षात आणि पक्षाअंतर्गत 'गतिरोधक" निर्माण झाला होता. तो दूर करून भाजप-रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्ष काम करणार आहे.

पुणे - रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) पक्षांतर्गत वादावर निवडणुकीनंतर निर्णय घेऊ. आगोदर भाजप-आरपीआय युतीचे उमेदवार निवडून आणू. तुर्तास महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. दहा महापालिका निवडणुकीत भाजप-युती झाली असून, आरपीआय भाजपचे काम करणार असल्याचे, आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे बोलणे झाले आहे. काही कारणांमुळे दोन्ही पक्षात आणि पक्षाअंतर्गत 'गतिरोधक" निर्माण झाला होता. तो दूर करून भाजप-रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्ष काम करणार आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड, मुंबई, सोलापुर, नागपुर या ठिकाणी 'कमळ" चिन्ह घेऊन लढणाऱ्या रिपब्लिकनच्या उमेदवारांचाही पक्ष प्रचार करणार आहे. जेथे आरपीआयने पुरस्कृत केलेले उमेदवार आहेत, तेथे "मैत्रीपुर्ण"लढत असेल. पुण्यात "कमळ" चिन्हावर लढणाऱ्या उमेदवारांचा निवडुन आल्यानंतर स्वतंत्र "आरपीआय गट" असेल, असे पत्र भाजपने दिले आहे, असे थुलकर यांनी सांगितले. 

'कमळ' चिन्ह घेणाऱ्यांची बाजू आठवले यांनी ऐकुन घेतली आहे. तर, नाराज लोकांची बैठक घेऊन त्यांचेही म्हणणे त्यांनी एकले. त्यादृष्टिने पक्षांतर्गत वादाबाबत नंतर निर्णय घेण्याचे त्यांनी सांगितले असून, सध्या भाजप-आरपीआयचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करण्याचे आदेश आठवले यांनी दिले आहेत.

Web Title: RPI alliance with BJP in municipal corporation election