महापालिकेने दुटप्पी धोरण अवलंबल्यास आंदोलन छेडणार; रिपब्लिकन पक्षाचा इशारा

पुणे महापालिकेत प्रशासक आल्यापासून हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई होत असून, राजकीय वरदहस्त असणाऱ्या मोठ्या व्यावसायिकांकडे काणाडोळा केला जात आहे.
RPI
RPISakal
Summary

पुणे महापालिकेत प्रशासक आल्यापासून हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई होत असून, राजकीय वरदहस्त असणाऱ्या मोठ्या व्यावसायिकांकडे काणाडोळा केला जात आहे.

पुणे - महापालिकेत प्रशासक (Administrator) आल्यापासून हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांवर (Professional) कारवाई (Crime) होत असून, राजकीय वरदहस्त असणाऱ्या मोठ्या व्यावसायिकांकडे काणाडोळा केला जात आहे. बेकायदेशीर वागणाऱ्या सर्वांवरच कारवाई करावी. मात्र, दुटप्पी धोरण अवलंबून विनाकारण गरीब व्यावसायिकांना त्रास दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (RPI) (आठवले गट) वतीने देण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या वेळी दिलेल्या निवेदनात हा इशारा देण्यात आला. शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक अशोक धेंडे, नगरसेविका हिमाली कांबळे, महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

या निवेदनानुसार, महापालिका कर्मचाऱ्यांवर झालेला हल्ला निंदनीय आहे. रिपब्लिकन पक्ष या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करीत आहे. प्रशासकांनी बेकायदेशीरपणे पथारी व्यवसाय करणारे नागरिक आणि बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचा पहिला निर्णय घेण्यात आला. कायद्यानुसार हे योग्य आहे. परंतु कोरोनाच्या दोन वर्षांमध्ये अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. त्याचा अधिक फटका हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांना बसला. मुलांची शाळेची फी, बँकेच्या कर्जाचे हफ्ते रखडले आहेत. परंतु बेकायदेशीर होर्डिंग, राजकीय पक्षांची बेकायदेशीर कार्यालये, विविध संघटना, संस्था यांचे नामफलक, पंचतारांकित हॉटेल्स व मॉलमधील अनधिकृत बांधकामे, पार्किंगमधील व्यवसायांवर कसलीही कारवाई होत नाही. महापालिकेने दुटप्पी धोरण न अवलंबता सर्व वर्गांना समान न्याय द्यावा. अन्यथा रिपब्लिकन पक्ष शहरामध्ये तीव्र आंदोलन करेल, असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com