"आरपीआय गट' अशीच निवडणुकीनंतरही ओळख 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

पुणे - रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) भाजपच्या "कमळ' चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय हा एकमताने घेतला आहे. निवडणुकीनंतर पक्षाच्या नगरसेवकांचे स्वतंत्र (आरपीआय गट) अस्तित्व राहील. तसे पत्र भाजपने आम्हाला दिले आहे, अशी माहिती रिपब्लिकनचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. 

रिपब्लिकनमधील नाराज गटाने चिन्हावरून निर्माण केलेला वाद, ठराविक पदाधिकाऱ्यांवर होणारे आरोप आणि भाजप-रिपब्लिकन युतीमध्ये झालेल्या चर्चेची माहिती दिली. या वेळी पक्षाचे निरीक्षक एम. डी. शेवाळे, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, महेश शिंदे, असित गांगुर्डे उपस्थित होते. 

शेवाळे म्हणाले, ""पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजांनी आरोप केले आहेत. यासंदर्भात आम्ही पक्षाच्या नेत्यांसमोर खुलासा करणार आहोत. ही नाराजी दूर करण्याचा आमचा प्रयत्न असेल.'' 

जानराव म्हणाले, ""पक्षाला अधिकृत चिन्ह नसल्याने सातत्याने फटका बसला आहे. या वेळी 2012 ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कमळ चिन्ह घेण्याचे ठरले.'' 

पक्षाला प्रत्येक निवडणुकीत झळ पोचली आहे. म्हणूनच चिन्हाबाबत सर्वांनी निर्णय घेतला. नाराजांची समजूत काढू, असे वाडेकर यांनी स्पष्ट केले. 

Web Title: rpi pmc election