चाकणकर यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आरपीआयचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

रूपाली चाकणकर मुर्दाबाद, रूपाली चाकणकर यांना पदावरून काढून टाका, अशा घोषणा देण्यात आल्या. चाकणकर यांच्या बॅनरला काळे फासून पायाने तुडवण्यात आले आले.

धायरी(पुणे) : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या रूपाली चाकणकर यांच्या निवासस्थानावर धडक मोर्चा काढून मारहाण करण्यास गेलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांना स्थानिक पोलिसांनी चाकणकर यांचे घराजवळ अडवून अटक केली.

यावेळी रूपाली चाकणकर मुर्दाबाद, रूपाली चाकणकर यांना पदावरून काढून टाका, अशा घोषणा देण्यात आल्या. चाकणकर यांच्या बॅनरला काळे फासून पायाने तुडवण्यात आले आले.

आठवलेंच्या कवितेवर टीका; चाकणकरांच्या घरावर RPI महिला आघाडीचा मोर्चा

''मोर्चा काढण्याचा आणि प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार हा देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या संविधानाने दिला आहे. त्यामुळे आरपीआय महिला आघाडीने माझ्या घरावर मोर्चा काढल्याबद्दल काही वाटत नसून त्यांचा तो अधिकार'' असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सकाळशी बोलताना सांगितले. 

मोर्चाचे नेतृत्व शहराध्यक्ष शशिकला वाघमारे, प्रदेश सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा संगीता आठवले, प्रदेश उपाध्यक्षा संघमित्रा गायकवाड,गटनेत्या सुनिता वाडेकर, पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक अध्यक्ष हलिमा शेख, रेखा चव्हाण, मंगल राजगे, मीना गालटे, शोभा झेंडे, प्रभा कांबळे, सुन्नाबी शेख, मिनाज मेमन, साक्षी बोराडे, ज्योती कांबळे, विजया वाघमारे, भारती शिंदे, नंदा निकाळजे, राजश्री कांबळे, रेखा कांबळे, सुजाता कांबळे, प्रियंका कांबळे, आशा आहिरे, सुनीता पिंपळे, सुनिता कांबळे, दीक्षा कांबळे, माधुरी कांबळे, वत्सला शिरसागर, अश्विनी दारोळे, जमुना माने, शगुफ्ता मेमन, जमीन शेख व अनेक महिला कार्यकर्त्या या ठिकाणी उपस्थित होत्या.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An RPI women office bearers who went to attack Chakankar house was arrested