Ayodhya Verdict : जनभावना, आस्था अन् श्रद्धेला न्याय देणारा निकाल : संघ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

 

पुणे : ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रामजन्मभूमीसंबंधी आज (ता. ९) सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने एकमताने दिलेल्या या ऐतिहासिक निकालाचे आम्ही स्वागत करतो. हा समस्त देशातील जनभावना, आस्था आणि श्रद्धेला न्याय देणारा निर्णय आहे.'', अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत सहसंघचालक प्रतापराव भोसले यांनी दिली आहे.

पुणे : ''राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी (ता.9) राम
मंदिराबाबत दिलेला निकाल हा देशातील जनभावना, आस्था आणि श्रद्धेला न्यायदेणारा आहे. हा निकाल ऐतिहासिक आहे. या निकालाचे राष्ट्रीय स्वयंसेवक
संघातर्फे स्वागत करत'' असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या
पश्‍चिम महाराष्ट्राचे प्रांत सहसंघचालक प्रतापराव भोसले यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने एकमताने हा निर्णय दिलाआहे. दीर्घकाळापासून चाललेला हा लढा यशस्वी करण्यात संपूर्ण समाज,
कायदेतज्ज्ञ, सरकार आणि प्रशासन या सर्वांनी मोठे योगदान दिले आहे.
त्यांच्या या योगदानाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करत असल्याचे
भोसले यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र
वंजारवाडकर यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने दिलेल्या या निकालामुळे प्रभू श्रीरामावरील संपूर्ण समाजाच्या आस्था व श्रद्धेला न्याय मिळाला आहे. या मंदिर निर्माण निकालाच्या निमित्ताने प्रभू श्रीरामाचा संयम, विवेक आणि संतुलन हे तीन आदर्श समाजात कायमस्वरूपी प्रस्थापित होतील, असा विश्वासही
त्यांनी यावेळी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RSS Gives Statement about Ayodhya Verdict