
पुणे - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी आलेल्या अर्जाची ऑनलाइन सोडत (लॉटरी) सोमवारी विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली. राज्यातील आठ हजार ८६३ शाळांमधील एकूण एक लाख नऊ हजार १११ जागांसाठी तीन लाख पाच हजार १५९ बालकांचे अर्ज आले आहेत. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन सोडत जाहीर झाली असली तरीही पालकांना प्रवेशाच्या निवड यादीसाठी शनिवारपर्यंत (ता.१५) वाट पहावी लागणार आहे.