Pune Schools
sakal
पुणे
Pune Schools: पुण्यातील ४७ टक्के खासगी शाळांची पाठ; शिक्षण हक्क कायदा, प्रवेश नोंदणीत शाळांचा हात आखडता
School Registration: आरटीई कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पुणे व पिंपरी-चिंचवडमधील अनेक खासगी शाळांनी नोंदणी केली नाही. शुल्क प्रतिपूर्ती रखडल्याने शाळांकडून प्रक्रियेला अल्प प्रतिसाद मिळत आहे.
पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये ‘२५ टक्के जागांवर मोफत प्रवेश’ अशी तरतूद असतानाही अंमलबजावणीत अडखळताना दिसत आहेत. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शहरातील जवळपास ४७ टक्के, तर पिंपरी-चिंचवडमधील ४०.५५ टक्के खासगी शाळांनी अद्याप शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी नोंदणी केली नसल्याची बाब उघड झाली आहे.

