आरटीई प्रवेशाचा गोंधळात गोंधळ

RTE
RTE

पिंपरी - आरटीईच्या प्रवेशाची चौथी फेरी सुरू असून संदेशावर अवलंबून न राहता पात्र पालकांनी वेबसाइटवर तपासणी करा, अशा सूचना शिक्षण संचालकांनी केल्या आहेत. प्रत्यक्षात संकेतस्थळावर ‘नॉट सिलेक्‍ट ऐनी राउंड’ असा संदेश येत असल्याने पालक गोंधळले आहेत. शिक्षण विभागाच्या नियोजनशून्य कारभाराविषयी ते संताप व्यक्त करत आहेत.

शहरात तिसऱ्या फेरीनंतर सुमारे ८०० जागा रिक्त आहेत. त्यासाठी दोन महिन्यांच्या अंतराने ९ सप्टेंबरला चौथी फेरी घेतली. मात्र, पहिल्या दिवशी संकेतस्थळ बंद असल्याने एक दिवस वाया गेला. दुसऱ्या दिवसापासून पालकांना संदेश येऊ लागले. ‘सिलेक्‍ट’ झालेल्या पाल्याच्या पालकांनी ११ ते २१ सप्टेंबरपर्यंत पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेणे बंधनकारक आहे. एसएमएस न आल्यास वेबसाइटवर जाऊन ॲप्लिकेशन वाईज डिटेल्समध्ये (Application Wise Details) अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली आहे का? ते पाहावे, एसएमएसवर अवलंबून राहू नये, असे शिक्षण संचालक दत्तात्रेय जगताप यांनी सांगितले.

प्रत्यक्षात पालकांना वेगळाच अनुभव येत आहे. अनेक पालकांनी वेबसाइटवर आयडी क्रमांकावर लॉगिन केल्यानंतर त्यांना ‘नॉट सिलेक्‍ट ऐनी राउंड’ असा संदेश दिसत आहे. कोणत्या फेरीचे नोटिफिकेशन आहे हे समजत नाही. तसेच प्रवेश न मिळालेल्या पालकांनाही मेसेज येत आहेत. यासाठी वेबसाइट अपडेट करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. चौथी फेरी सुरू झाल्यानंतर बऱ्याच पालकांनी तीन किलोमीटरच्या परिसरातील शाळेमध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे प्रवेशच घेतला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com