
पुणे - बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची निवड यादी शुक्रवारी (ता. १४) जाहीर करण्यात येणार आहे. ऑनलाइन सोडतीत निवड झालेल्या बालकांचे प्रवेशाची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होणार असून २८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशाची मुदत आहे.
प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन सोडतीतील निवड झालेल्या बालकांच्या पालकांची कागदपत्रे पडताळणीसाठी तालुका, वॉर्ड स्तरावर पडताळणी समिती स्थापन केली आहे. समितीला आरटीई पोर्टलवर त्यांच्या लॉगिनला विद्यार्थ्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक दिले जातील.
कागदपत्राची प्राथमिक तपासणी करून योग्य असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाइन नोंद करण्यात येईल. पालकांकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला, असे नोंद करण्यात येईल. समितीने संबंधित विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासणी करून प्रमाणित केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी सुविधा आरटीई पोर्टलवर करण्यात येईल.
पडताळणी समितीने तपासणी केलेले पात्र विद्यार्थी गटशिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीचे पत्र घेऊन शाळेत जातील. शाळा स्तरावर कागदपत्रांची कोणतीही तपासणी करण्यात येणार नाही. दरम्यान, पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
दिशाभूल केल्यास प्रवेश होणार रद्द
बालकांची खोटी किंवा चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केल्याचे निदर्शनास आल्यास दिशाभूल केल्याप्रकरणी आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल, असे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.