RTE Admission : आरटीई २५ टक्के राखीव जागांसाठी एक लाख एक हजार ९१६ जणांची निवड; ८५ हजार बालकांचे अर्ज प्रतीक्षेत

आरटीईनुसार खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील ऑनलाइन सोडतीतील निवड यादी शुक्रवारी जाहीर केली.
RTE Admission
RTE Admissionsakal
Updated on

पुणे - बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची निवड यादी जाहीर झाली आहे. राज्यातील एकूण एक लाख नऊ हजार ८७ जागांसाठी ऑनलाइन सोडतीद्वारे एक लाख एक हजार ९१६ बालकांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. तर, ८५ हजार ४०६ बालकांचे अर्ज प्रतीक्षा यादीत आहेत.

आरटीईनुसार खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील ऑनलाइन सोडतीतील निवड यादी शुक्रवारी जाहीर केली. राज्यातील आठ हजार ८६३ शाळांमधील एक लाख नऊ हजार ८७ जागांसाठी तब्बल तीन लाख पाच हजार १५२ बालकांच्या प्रवेशाचे अर्ज आले आहेत. त्यातील एक लाख एक हजार ९१६ बालकांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.

आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल मंदावून शकते. त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा, अशी सूचना शिक्षण विभागाने दिली आहे. निवड यादीत प्रवेश पात्र बालकांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे.

निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांनी अर्ज भरताना नोंदविलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रति आणि साक्षांकित प्रति घेऊन जाव्यात तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिनमधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढावी काढून घ्यावी. पालकांनी प्रवेशादरम्यान आपल्याबरोबर आरटीई पोर्टलवर असलेल्या हमी पत्राची छायाकिंत प्रत देखील घेऊन जावी.

आरटीई ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील. परंतु पालकांनी फक्त ‘एसएमएस’वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर ‘अर्जाची स्थिती’टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी.

प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी ‘अर्जाची स्थिती’ या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतरच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जाणार आहेत, असे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

प्रवेशाच्या निवड यादीतील आकडेवारी -

जिल्हा : शाळांची संख्या : प्रवेशासाठी उपलब्ध जागा : आलेल्या अर्जांची संख्या : निवड आलेल्या बालकांची संख्या

पुणे : ९६० : १८,४९८ : ६१,५७३ : १८,१६१

ठाणे : ६२७ : ११,३२२ : २५,७७४ : १०,४२९

छत्रपती संभाजीनगर : ५६२ : ४,४०८ : १६,७७६ : ४,३४९

नाशिक : ४०७ : ५,२९६ : १७,३८५ : ५,००३

नागपूर  : ६४६ : ७,००५ : २९,९१३ : ६,९१२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com