आरटीई २५ टक्के प्रवेशात आता राष्ट्रीयकृत बॅंकेचेच खातेपुस्तक ग्राह्य

प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून निवासी पुराव्याच्या कागदपत्रांत बदल
RTE
RTEGOOGLE

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के (RTE 25%)राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत आता निवासी पुराव्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार निवासी पुरावा म्हणून आता गॅस बुक,(Gas book) तसेच राष्ट्रीयीकृत बॅंक वगळता अन्य बॅंकांचे खातेपुस्तक(Passbook) प्रवेश प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार नाही, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने नुकतेच स्पष्ट केले आहे.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. दरवर्षी या राखीव जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते.

RTE
कोरोना होम टेस्टमध्ये 3549 पॉझिटिव्ह - किशोरी पेडणेकर

त्यानुसार, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून पालकांना १ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. या पार्श्वभूमीवर, प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्रांच्या बदलांबाबतची माहिती परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. लवकरच ही माहिती प्रवेशाच्या पोर्टलवर अपडेट करण्यात येणार आहे.गेल्यावर्षीपर्यंत (२०२१-२२) प्रवेश प्रक्रियेत निवासी पुराव्यासाठी शिधापत्रिका, वाहन चालविण्याचा परवाना, वीज-दूरध्वनी देयक, मिळकत कर देयक, गॅस बुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र, बॅंक खाते पुस्तक, इतर स्थानिक बॅंकेचे खाते पुस्तक आणि ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी नोंदणीकृत केलेला भाडेकरार यापैकी कोणतेही एक कागदपत्र ग्राह्य धरले जात होते. मात्र यंदा यात बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार, निवासी पुराव्यासाठी शिधापत्रिका, वाहन चालविण्याचा परवाना, वीज-दूरध्वनी देयक, मिळकत कर देयक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र ग्राह्य धरण्यात येईल. तर निवासी पुरावा म्हणून गॅस बुक ग्राह्य न धरण्याचा शासनाचे आदेश आहेत. तसेच राष्ट्रीयीकृत बॅंकेचेच खातेपुस्तक निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. इतर स्थानिक बॅंकेचे व पतसंस्थेचे खातेपुस्तक ग्राह्य धरले जाणार नाही, असे प्राथमिक संचालनालयाने सांगितले आहे.

RTE
नागपूर : मिठाईवरील ‘एक्स्पायरी डेट’ गायब

‘‘प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, या दृष्टीने निवासी पुराव्यात गॅस बुक ग्राह्य धरू नये, तसेच राष्ट्रीयीकृत बॅंकेचेच खातेपुस्तक निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरावे, असे बदल करण्याची शिफारस राज्य सरकारकडे साधारणत: तीन महिन्यांपूर्वी केली होती. त्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे निवासी पुराव्याच्या कागदपत्रातील हे बदल यंदाच्या म्हणजेच शैक्षणिक वर्ष २०२२-२३च्या प्रवेश प्रक्रियेपासून लागू होणार आहे.’’

- राजेश क्षीरसागर, सहसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून निवासी पुरावा म्हणून लागणारी कागदपत्रे

  • रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज/टेलिफोन देयक, घरपट्टी देयक, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल

  • ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून अयोग्य किंवा अपूर्ण असतील तरच भाडेकरार हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल

  • यातील भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा

  • फक्त भाडेकरार हा पर्याय नाही, याची नोंद घ्यावी

  • तसेच भाडेकरार हा प्रवेशाचा ऑनलाइन अर्ज भरण्याच्या दिनांकापूर्वीचा असावा आणि त्याचा कालावधी एक वर्षाचा असावा.

यंदापासून हे ग्राह्य धरले नाही जाणार

  • गॅस बुक

  • स्थानिक बॅंकेचे तसेच पतसंस्थेचे पासबुक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com