आरटीईसाठी कागदपत्र पडताळणी समिती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

हे आहेत समिती सदस्य 
समितीमध्ये शासकीय शाळेच्या मुख्याध्यापिका शैला मातेरे, रोहिणी जोशी, महेंद्र भोसले, तुकाराम लांघी, लक्ष्मण मोहरे, परमेश्‍वर शिंदे, नवाज शेख, श्रुतिका जाधव, चंदा आतकरी, सोनाली दळवी, मल्लापा सलगुटके, समिना मोमीन, दत्तात्रेय शिंदे, गणेश घोंगरे, भाऊराव घोडे, आशिषकुमार बनकर, रवींद्र शिंदे, संतोष गवारे, प्रमोद शिंदे, राजश्री जाधव, अनिता जोशी, शिवाजी माने, अंकुश बोडके, लतीफ शेख, स्मिता सरवनकर, सुनील लांघी, अजय चव्हाण, विद्या दुधाळकर, डेनिस मुगलस्वामी, सोनाली कुंजीर, सचिन कुलकर्णी, रजिया खान यांचा समावेश आहे.

पिंपरी - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशाची पहिली सोडत सोमवारी काढण्यात आली. याबाबत पालकांना प्रवेश निश्‍चितीबाबतच संदेश (एसएमएस) मोबाईलवर मिळतील. नव्या नियमांनुसार या प्रवेशाकरिता कागदपत्र पडताळणी समितीची स्थापना करण्यात आली असून, गुरुवारपासून (ता. ११) समितीकडून पालकांनी कागदपत्रे तपासून घ्यायची आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात १७२ शाळांमध्ये आरटीईअंतर्गत साडेतीन हजार जागांवर प्रवेश देण्यात येणार आहेत. त्यासाठी जवळपास साडेचार हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. आरटीई प्रवेश घेण्यासाठी आता नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. या वर्षापासून शाळास्तरावर कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी होणार नाही. तर, प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली २० सदस्यांची पडताळणी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे कामकाज पिंपरी आणि आकुर्डी या दोन विभागांत चालणार आहे. प्रवेशपत्रावर (ॲलॉटमेंट लेटर) मुलांना जी शाळा मिळाली आहे, त्या शाळेशी संलग्न पडताळणी समितीचे नाव आणि पत्ता दिला जाणार आहे. 

पालकांनी या समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून घ्यायची आहे. त्याअंतर्गत पालकांनी कागदपत्रांच्या दोन प्रती काढाव्यात. त्यापैकी एक संच पडताळणी समितीकडे जमा करावा आणि एक संच शाळेकडे जमा करावा. उन्नत समूह साधन केंद्रांतर्गत पिंपरी विभागासाठी कर्मवीर भाऊराव पाटील शाळा आणि आकुर्डी विभागासाठी फकीरभाई पानसरे उर्दू शाळेत समितीचा कारभार चालणार आहे. समितीचे अध्यक्ष म्हणून गटशिक्षणाधिकारी पराग मुंढे काम पाहणार आहेत.

 

Web Title: RTE Document Checking Committee School Education