
तुम्ही आपल्या पाल्यांला शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राखीव असणाऱ्या 25 टक्के जागांवर शाळेत प्रवेश मिळावा म्हणून प्रतीक्षा करत आहात का! अहो, मग आता तुमची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आरटीई 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे.
पुणे : तुम्ही आपल्या पाल्यांला शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राखीव असणाऱ्या 25 टक्के जागांवर शाळेत प्रवेश मिळावा म्हणून प्रतीक्षा करत आहात का! अहो, मग आता तुमची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आरटीई 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. त्यानुसार आता पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे अर्ज 9 फेब्रुवारीपासून ऑनलाइनद्वारे भरता येणार आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरिता राबविलेल्या प्रवेश प्रक्रिये जानेवारी 2021 पर्यंत सुरू होती. कोरोनाच्या संकटामुळे या प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला. या प्रवेशाची पहिल सोडत मार्च 2020 मध्ये काढण्यात आली होती. मात्र, त्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाल्याने प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर जुनपासून ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. परंतु पहिल्या आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी वारंवार मिळत मुदतवाढ मिळाल्याने ही प्रक्रिया लांबत गेली. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पालक चिंतेत होते. आता पालकांची ही चिंता दूर झाली असून लवकरच या प्रवेश प्रक्रियेतंर्गत पाल्याच्या प्रवेशाकरिता पालकांना अर्ज करता येणार आहे.
पुण्यात पुन्हा होणार एल्गार परिषद
दरवर्षी प्रमाणे 2021-22 या वर्षांसाठी ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात येत आहे. त्यासाठी सर्व पात्र शाळांना 30 जानेवारीपर्यंत नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. शाळांनी केलेल्या नोंदणीची पडताळणी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असतानाही नोंदणी न केलेल्या किंवा प्रवेश स्तरावरील एकूण प्रवेश क्षमतेच्या 25 टक्के जागा उपलब्ध करून न देणाऱ्या शाळांवर तात्काळ नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
या प्रवेश प्रक्रियेतंर्गत पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी 9 ते 26 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. प्रवेशासाठी एकच लॉटरी काढण्यात येणार असून शाळेच्या रिक्त जागेनुसार प्रतीक्षा यादी जाहीर केली जाणार आहे.
पुण्यात कचरा प्रक्रिया प्रकल्पाला भीषण आग; मशिनरी जळून खाक
आरटीई 25 टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2021-22 संभाव्य वेळापत्रक :
- तपशील : कालावधी
- पालकांनी ऑनलाइन अर्ज भरणे : 9 ते 36 फेब्रुवारी
- सोडत (लॉटरी) काढणे : 5 ते 6 मार्च
- लॉटरीद्वारा प्रवेश मिळालल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे : 9 ते 36 मार्च
Edited By - Prashant Patil