आरटीईच्या "ऑनलाइन'ला तांत्रिक विघ्न 

आरटीईच्या "ऑनलाइन'ला तांत्रिक विघ्न 

पिंपरी - दरवर्षी आरटीई प्रक्रियेला अनेक दिव्यातून जावे लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून आरटीईचे तांत्रिक अडचणीमुळे संकेतस्थळ बंद आहे. मात्र, दुसरीकडे ऑनलाइन अर्ज भरण्यास केवळ सहा दिवसांचा कालावधी उरला आहे. सरकारच्या या बेजबाबदार कारभारामुळे प्रक्रियेच्या सुरुवातीलाच विघ्न निर्माण झाल्याने पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्वरित आरटीईबाबत योग्य उपाययोजना कराव्यात, अशी पालकांची मागणी जोर धरू लागली आहे. 

आरटीईचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे आपोआपच ऑनलाइन अर्ज भरण्यास विलंब झाला आहे. या बाबत प्रशासनाला कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक वर्षी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेमध्ये खूप गोंधळ होत आहे. त्यामुळे आरटीईच्या मुळे उद्देशाला हरताळ फासला जात आहे. त्यातच आता "तांत्रिक अडचणीमुळे पालकांना मोबाईलवर एमएमएस जात नाहीत. नवीन रजिस्ट्रेशन केल्यावर स्क्रीनवर येणारा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड जतन करून ठेवल्यास पालकांना अर्ज भरता येतील,' असा संदेश आरटीईच्या संकेतस्थळावर गेल्या चार दिवसांपासून झळकत आहे. त्यामुळे सातत्याने पालक ऑनलाइन अर्ज करीत आहेत. परंतु कांही तांत्रिक अडचणीमुळे मोबाईलवर ऍप्लिकेशन नंबर व पासवर्ड एमएमएस जात नसल्याने पालक हैराण झाले आहेत. आरटीई ऑनलाइन अर्ज भरायला पुन्हा विघ्न सुरू झाले आहे. सरकारच्या या बेजबाबदार कारभारामुळे पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. फॉर्म भरण्यासाठी बऱ्याच पालकांनी रजा टाकली होती. वेळेचा अपव्यय व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यापूर्वी एमएमएस न आलेल्या पालकांनी काय करावे? हा सर्व गोंधळ सर्व सामान्य पालकांना न समजणारे आहे. त्यामुळे त्वरित आरटीईबाबत सरकारने योग्य उपाययोजना करावी. 

""शिक्षण विभागाकडून जाणीवपूर्वक आरटीईबाबत दरवर्षी गोंधळ होत आहे. वीस फेबुवारीपासून निव्वळ तांत्रिक कारण पुढे करून आरटीईचे संकेतस्थळ बंद आहे. सरकार संकेतस्थळ दुरुस्ती करू शकत नाही का, अशाने गरिबांच्या मुलांना शिक्षणाचा हक्क मिळत नाहीय,'' 
- शरण शिंगे, उपाध्यक्ष, आरटीई शिक्षण सेवा संघ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com