आरटीई प्रवेशात ‘ओटीपी’ची अडचण

RTE
RTE

पुणे - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जात नवीन नोंदणी दरम्यान पालकांच्या मोबाईलवर ‘ओटीपी क्रमांक’ येतो. मात्र, सध्या हा ओटीपी मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ही ‘ओटीपी’ची तांत्रिक अडचण दूर होईपर्यंत पालकांना अर्ज भरता येणार नाही. त्यामुळे प्रवेशाच्या पोर्टलवर ‘ओटीपी’ची तांत्रिक अडचण दूर झाल्याची सूचना आल्यानंतरच अर्ज भरण्यास सुरवात करावी, अशी सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेश अर्ज भरण्यासाठी पालकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव असणाऱ्या जागांवरील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील प्रवेशाकरिता ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची सोय ३ मार्चपासून उपलब्ध झाली. आतापर्यंत राज्यातील एक लाख ३५ हजार ६८४ विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरले गेले आहेत. परंतु प्रवेश अर्ज भरण्यासाठी अवघ्या आठवडाभराची मुदत शिल्लक असतानाच, पालकांच्या मोबाईलवर ओटीपी क्रमांक मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या चिंतेत असणाऱ्या पालकांना तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पालकांना येत्या रविवारपर्यंत (ता. २१) ऑनलाइन अर्ज नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे राज्यातील ९६ हजार ६५८ जागांकरिता येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जाची संख्या दोन लाखांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परंतु ऑनलाइन अर्ज भरताना पालकांनी नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर ‘ओटीपी’ वेबपोर्टलद्वारे पाठविण्यात येतो. हा ओटीपी आल्यानंतरच त्याच्या साहाय्याने अर्ज भरण्याची पुढील प्रक्रिया खुली होते. मात्र ओटीपी मिळण्यातील तांत्रिक अडचणींमुळे पालकांना गेल्या दोन दिवसांपासून अर्ज भरता येत नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान शिक्षण विभागाच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी ‘पोर्टलवर ‘ओटीपी’ची तांत्रिक अडचण आलेली आहे. ती दूर करण्याचे काम सुरु आहे. तोपर्यंत पालकांनी अर्ज भरू नयेत. ओटीपीची तांत्रिक अडचण दूर झाल्याची सूचना पोर्टलवर दिली जाईल.’’ असा संदेश दिला आहे. याबाबत अधिक माहितीसाठी पालकांनी आरटीई प्रवेशाच्या ‘https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex’ या पोर्टलला भेट द्यावी, असे शिक्षण विभागाने केले आहे. 

शाळांमधील रिक्त जागा आणि प्रवेशासाठी आतापर्यंत आलेले अर्ज : 

राज्य : 
- शाळा : आरटीई २५ टक्के राखीव असलेल्या रिक्त जागा : आलेले अर्ज 
- ९,४३२ : ९६,६५८ : १,३५,६८४ 

जिल्हानिहाय आकडेवारी : 
-जिल्हा : शाळा : आरटीई २५ टक्के राखीव असलेल्या जागा : आलेले अर्ज 

- पुणे : ९८५ : १४,७७३ : ३६,४७२ 
- ठाणे : ६७७ : १२,०७४ : ११,४५० 
- नागपूर : ६८० : ५,७२९ : १६,८८५ 
- नाशिक : ४५० : ४,५४४ : ८,००९ 
- नगर : ४०२ : ३,०१३ : २,४३८

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com