आरटीआय कार्यकर्त्याला सुनावणीदरम्यान कनिष्ठ अभियंत्याच्या पत्नीकडून मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

आरटीआय कार्यकर्त्याला सुनावणीदरम्यान कनिष्ठ अभियंत्याच्या पत्नीकडून मारहाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे ः महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यानं नाकारलेल्या माहिती संदर्भात माहिती अधिकार कायद्याअंतर्गत सुनावणी सुरू असताना या कनिष्ठ अभियंत्याच्या पत्नीने कार्यालयात घुसून अर्जदारास मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावर प्रशासनाने सावध भूमिका घेत आमच्याकडे तक्रार आली असून, सोमवारी (ता. १५) चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेंद्र दीक्षित यांनी याप्रकरणी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याकडे तक्रार केली आहे. शुक्रवार पेठेतील एका बांधकामासंदर्भात दीक्षित यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज टाकलेला आहे. त्यावर महापालिकेच्या सावरकर भवन येथील बांधकाम विभागाच्या झोन सातचे उप अभियंता श्रीकांत गायकवाड यांच्याकडे संबंधित कनिष्ठ अभियंत्यांच्या समोर दीक्षित यांची दुपारी सुनावणी सुरू होती. त्यावेळी एक महिला अचानक येथे येऊन दीक्षित यांना मारहाण सुरू केली. तू मला धक्का कसा काय मारला असा जाब विचारत माझ्या पतीला एकेरी भाषेत कसा काय बोलला असे विचारत मारहाण सुरू ठेवली. याप्रकारामुळे बांधकाम विभागात चांगलाच गोंधळ उडाला. अखेर गायकवाड यांनी या ठिकाणी काही करू असे समजून सांगत त्यांना तेथून बाहेर पाठवले.

हेही वाचा: T20 World Cup : २०२१ मध्ये मिळणार नवा चॅम्पियन

बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सुधीर कदम म्हणाले,‘‘या महिलेला दीक्षित यांनी जिन्यामध्ये धक्का दिल्याने मारहाण केली असल्याचे सांगण्यात आले आहे. तर दीक्षित यांनी घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार केली आहे. या प्रकरणावर सोमवारी चौकशी केली जाणार आहे.

loading image
go to top