पुण्यात रिक्षांची संख्या वाढणार; नव्या परवान्यांच्या वाटपाच्या तारखा 'आरटीओ'ने केल्या जाहीर

Auto_Rickshaw
Auto_Rickshaw

पुणे : गेल्या पाच महिन्यांपासून रखडलेल्या नव्या रिक्षांच्या परवानांचे वाटप २१ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान सुरू होणार असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जाहीर केले आहे. त्यामुळे शहरात रिक्षांच्या संख्यात सहाशेने भर पडणार आहे. 

राज्य सरकारने रिक्षांचे परवाने खुले केले आहेत. पूर्वी या परवान्यांवर मर्यादा होती. आता मागेल त्याला परवाना देण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले आहे. त्यानुसार लॉकडाउनच्या पूर्वी आणि दरम्यानच्या काळात ज्यांनी परवान्यांसाठी अर्ज केले होते, अशा सर्व चालकांना रिक्षांचे परवाने 21 सप्टेंबरपासून मिळणार आहेत. त्यासाठी 'आरटीओ' कार्यालयाने वेळापत्रक जाहीर केले आहे. 

रिक्षांचा परवाना मिळावा, अपॉईंटमेंट मिळालेल्या अर्जदारांनी वेळापत्रकानुसार त्या-त्या तारखांना सकाळी साडेदहा ते दुपारी बारा दरम्यान उपस्थित रहावे, असे आवाहन आरटीओ कार्यालयाने केले आहे. अर्जदारांनी येताना 500 रुपये शुल्क भरल्याची पावती, लायसन आणि बॅज, पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, लाईटबील, रहिवासी दाखला), नामनिर्देशन प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी अहवाल, स्वयंघोषणापत्र आणि एक फोटो घेऊन यावा, असे आरटीओने म्हटले आहे. तसेच कागदपत्रांच्या छायांकित आणि मूळ प्रती सोबत असाव्यात, असेही आरटीओने स्पष्ट केले आहे. 

पूर्वी अपॉईनमेंट मिळालेला महिना उपस्थित राहण्याचा कालावधी 
मार्च 2020 पूर्वी 21 सप्टेंबर ते 1 ऑक्‍टोबर 
एप्रिल 20 5 ते 9 ऑक्‍टोबर 
मे 20 12 ते 16 ऑक्‍टोबर 
जून 20 19 ते 23 ऑक्‍टोबर 
जुलै 20 26 ते 29 ऑक्‍टोबर 
ऑगस्ट 20 2 ते 6 नोव्हेंबर 
सप्टेंबर 20 9 ते 13 नोव्हेंबर 
ऑक्‍टोबर 20 17 ते 20 नोव्हेंबर 
नोव्हेंबर 20 23 ते 27 नोव्हेंबर 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com