RTO Corruption News : ‘आरटीओ’मधील भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यास मारहाण

प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) कार्यालयातील कथित भ्रष्टाचाराविरुद्ध उपोषण करणाऱ्या एका संघटनेच्या कार्यकर्त्याला बांबूने मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत बंडगार्डन पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
RTO Corruption News
RTO Corruption Newssakal

Pune News : प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) कार्यालयातील कथित भ्रष्टाचाराविरुद्ध उपोषण करणाऱ्या एका संघटनेच्या कार्यकर्त्याला बांबूने मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत बंडगार्डन पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी अजय पोपट मखरे (वय २३, रा. सदगुरू कॉलनी, वाकड) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून नितीन परदेशी, देवा खिंवसरा, विनोद जाधव यांच्यासह अन्य एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय मखरे ऑल इंडिया वाहनचालक-मालक संघटनेचा कार्यकर्ता आहे.

आरटीओ कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत मखरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात रविवारी (ता. ४) उपोषण सुरू केले. त्यावेळी आरोपींनी मखरे यांना उपोषणाला का बसतो? अशी विचारणा करून बांबूने आणि हत्याराने मारहाण केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com