
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फूड कोर्टमधून ही घटना समोर आली आहे. फूड कोर्टमधील कॅन्टीनच्या जेवणात रबर निघाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.