बनावट गिऱ्हाईक तयार केले; पुण्यातील किडनी रॅकेटमध्ये ट्विस्ट | Pune Kidney Racket | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ruby Hall Clinic | Pune Kidney Racket

बनावट गिऱ्हाईक तयार केले; पुण्यातील किडनी रॅकेटमध्ये ट्विस्ट

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध हॉस्पिटल रुबीहॉल मध्ये बनावट किडनी प्रत्यारोपणाच्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. बनावट किडनी प्रत्यारोनाच्या ५ केसेस समोर आल्या असून त्यानंतर आता पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे. दरम्यान अभिजित गटने आणि रवींद्र रोडगे या दोन एजंटने बनावट गिऱ्हाईक तयार केले असल्याची माहिती समोर आली आहे.

(Fake Kidney Transplant In Ruby Hall Clinic Pune)

पोलिसांच्या चौकशीदरम्यान या एजंटने ८ ते ९ जणांचे बनावट किडनी प्रत्यारोपण केले असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील रूबी ह़ल क्लिनिक, इनामदार हॉस्पिटल, ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल आणि कोईंबतूर येथील हॉस्पिटलमध्ये हे एजंट बनावट गिऱ्हाईक बनवून पाठवायचे असं चौकशीतून समोर आलं आहे. दरम्यान किडन्या दान करणारे आणि बनावट गिऱ्हाईक असणाऱ्या व्यक्तींचा पोलिस शोध घेत आहेत.(Pune Kidney Racket)

हेही वाचा: 'मला माफीचा साक्षीदार करा'; सचिन वाझेंचा कोर्टात अर्ज

दरम्यान किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणात पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेज ग्रँट, कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी यांच्यासह १५ जणांवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना ही नवीन माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात डॉ. परवेज ग्रेट, रेबेका जॉन (डेप्युटी डायरेक्टर मेडीकल सव्हिर्सेस), कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी, डॉ. अभय सद्रे (कन्सलटंट नॅफ्रोलॉजिस्ट), डॉ. मुफ्त भाटी (युरोलॉजिस्ट), डॉ. हिमेश गांधी (युरोलॉजिस्ट), सुरेखा जोशी (ट्रान्सप्लांट कॉर्डीनेटर) यांच्यासह अमित साळुंखे, सुजाता साळुंखे, सारिका सुतार, अण्णा साळुंखे, शंकर पाटील, सुनंदा पाटील, रवी गायकवाड, अभिजित मदने यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉक्टर संजोग कदम यांनी फिर्याद दिली होती. फसवणूक व मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title: Ruby Hall Clinic Illegal Kidney Transplant 5 Case File Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top