

Ruchita Adhalrao KBC
esakal
पुणे : मूळचे लांडेवाडी (ता. आंबेगाव) व सध्या मुंबईत राहणाऱ्या अरूणा व रमेश आढळराव यांची कन्या कु. रुचिता आढळराव हिने ज्ञान, अभ्यास, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर लोकप्रिय सोनी वाहिनीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या मंचावर उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ५० लाख रुपये जिंकले आहेत. तिने मिळवलेल्या या यशामुळे तिचे खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.