राज्य मानांकन टेबल टेनिस

राज्य मानांकन टेबल टेनिस
Published on

पुण्याच्या रुचिता दारवटकरचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

पुणे, ता. २६ ः नागपूर जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने नागपूर येथे सुरू झालेल्या पहिल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत महिला गट एकेरीतून पुण्याच्या रुचिता दारवटकरने उपांत्यपूर्व फेरी गाठताना मुंबई शहरच्या सहाव्या मानांकित श्वेता पारटे-नायकला ११-९, ९-११, ११-९, ११-२ असे नमविले.
नागपूर येथील सुभेदार सभागृहात सुरू झालेल्या या स्पर्धेत  नाशिकच्या स्वरा करमरकरने सातव्या मानांकित पुण्याच्या पृथा वर्टीकरचा ११-६, ११-२, ४-११, ११-८ असा पराभव केला.
 पुरुष गटात पुण्याच्या ईशान खांडेकर, भार्गव चक्रदेव, शौनक शिंदे आणि शौरेन सोमणने आगेकूच केली. तिसऱ्या फेरीत ईशान खांडेकरने ठाण्याच्या मयूरेश सावंतचा ९-११, ११-७, ११-६, ११-५ असा, शौनक शिंदेने पुण्याच्याच प्रणव घोलकरचा १२-१४, १२-१०, ११-३, ११-४ असा, शौरेन सोमणने पुण्याच्याच अर्णव भाळवणकरचा ११-८, ११-५, ११-६ असा, तर भार्गव चक्रदेवने मुंबई उपनगरच्या आयुष सोनवणेचा ११-८, ११-८, ९-११, ११-४ असा पराभव केला होता. जश मोदीने पुण्याच्या शौनक सानापुरकरवर १४-१२, ११-९, १०-१२, १२-१० असा,
तन्मय राणेने पुण्याच्या रजत कदमवर ११-८, ११-९, ११-८ असा तर अर्णव क्षीरसागरने कौस्तूभ गिरगांवकरवर ९-११, ११-६, ११-१३, १२-१०, १३-११ असा विजय प्राप्त केला होता.
--------------
------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com