Rudra Kate : रूद्रला हवाय मदतीचा हात; मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी वडिलाची धावाधाव

बहिरेपणा गेल्यावर रूद्रचे आयुष्य बदलून जाईल! डॅाक्टरांचा विश्वास
Rudra Kate
Rudra Katesakal

शिवाजीनगर - अवघा पाच वर्षाचा रूद्र जन्मापासून कर्णबधिर असल्याने त्याला सर्वसामान्य माणसाप्रमाणे ऐकता किंवा बोलता येत नाही. त्याचा कर्णबधिरपणा घालवण्यासाठी कर्ण रोपण शस्त्रक्रिया (कॉक्लिअर इम्प्लांट) करण्यासाठी जवळपास पंधरा लाख रूपये खर्च येत असून पैशाची जमवाजमव करण्यासाठी रूद्रचे वडील घनश्यम काटे यांची परवड सुरू आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अल्प भुधारक शेतकरी कुटूंबातील घनश्याम काटे हे पुण्यातील पीएमटीवर चालक म्हणून काम करतात. गावाकडं हालाकिची परिस्थिती असल्यामुळे नोकरीसाठी पुणे गाठावे लागले. लग्नानंतर मूलगी व मुलगा अशी दोन अपत्य जन्मला आली.

परंतु, मुलगा रूद्र कर्णबधिर असल्याने त्याची लहान वयातच कॉक्लिअर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे. पुण्यातील केईएम रूग्णालयात ही क्लिष्ट शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात करायची असून यासाठी समाजातील दनशूरांनी मदत करावी असे जड अंत: करणांने काटे यांनी सांगितले.

आर्थिक मदतीसाठी

नाव रूद्र घनश्यम काटे

इडियन बॅंक, शाखा ससाने नगर

आयएफसी कोड: IDIB000H046

खाते क्रमांक - ७०२६४४४६५२

फोन पे नंबर : ९६०४६१८४१३

'कॉक्लिअर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया लहान वयातच केली जाते. पालकांची आर्थिक परिस्थिती कशी आहे ? यावरून बरेच पालक शस्त्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय घेतात. शस्त्रक्रियेसाठी समाजिक संस्था, समाजातील दानशूर मांडळी मदत करतात. शस्त्रक्रिया केल्यानंतर मुलाचे आयुष्य बदलू शकते.'

- डॅा. अजिंक्य केळकर, कान - नाक- घसा तज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com