Elections 2021: अखेर गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकीसाठी नियमावली जाहीर!

Election_Housing
Election_Housing
Updated on

पुणे : अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याबाबत राज्य सरकारने बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर नियमावली जाहीर केली. याबाबत येत्या २२ फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक प्रक्रियेस मार्चमध्ये प्रारंभ होण्याची शक्यता असून, एप्रिल महिन्यात नवीन संचालक मंडळ येणे अपेक्षित आहे. 

अडीचशेपेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका त्यांनी स्वत: घ्याव्यात, असा आदेश मागील राज्य सरकारने दिला. परंतु निवडणुका कशा घ्याव्यात, याबाबत मात्र नियमावली जाहीर केलेली नव्हती. तत्कालीन राज्य सरकारने नियमावली तयार करण्यास उशीर होत असल्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांच्या संचालकांना ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली होती. विधानसभा निवडणुकीनंतर नियमावली जाहीर करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. परंतु ते शक्य झाले नाही. त्यानंतर विद्यमान सरकारने कृषी कर्जमाफी आणि मार्च महिन्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव या कारणांमुळे निवडणुका ३१ डिसेंबर २०२० पर्यंत पुढे ढकलल्या होत्या. 

राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. परंतु अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका कशा घ्याव्यात, याबाबत नियमावली प्रसिद्ध केली नव्हती. त्यामुळे निवडणूक घेणे शक्य नव्हते. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी नियमावली लवकरच जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. याबाबत ‘सकाळ’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर नियमावली जाहीर झाल्यामुळे या निवडणुका घेणे शक्य होणार आहे.

गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकीबाबत नियमावली जाहीर केल्याबद्दल निर्णयाचे स्वागत. गृहनिर्माण सोसायटीने नेमलेल्या निवडणूक अधिकाऱ्याला प्रशिक्षण घेणे अनिवार्य केले आहे. पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाकडून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सोसायट्यांनी २२ फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना जिल्हा गृहनिर्माण महासंघाच्या punefed@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात. त्या एकत्रितपणे राज्य सरकारकडे पाठविण्यात येतील. 
- सुहास पटवर्धन, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ 

राज्यातील गृहनिर्माण संस्था - सुमारे एक लाख 
अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या संस्था - ८५ हजार 
पुणे जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्था - १८ हजार 
अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या संस्था- १५ हजार

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Water Dispute and Assault Case: Court Verdict
Unique Tradition: 'Ek Gaon Ek Ganpati' in Ranjangaon and Surrounding Areas
Marathi News Esakal
www.esakal.com