esakal | पंतप्रधानांच्या भाषणावर अखिलेश यादव आक्रमक; मोदींना म्हणाले 'चंदा जिवी'
sakal

बोलून बातमी शोधा

Akhilesh_Yadav

आंदोलनातूनच देशाला स्वातंत्र्य मिळालं असल्याची आठवणही यादव यांनी पंतप्रधानांना करून दिली.

पंतप्रधानांच्या भाषणावर अखिलेश यादव आक्रमक; मोदींना म्हणाले 'चंदा जिवी'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनजीवी बाबत केलेल्या विधानावर आता विरोधकांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे. समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदींवर पलटवार केला आहे. देणग्या गोळा करण्यासाठी बाहेर पडलेल्यांना काय म्हणायचे? असा प्रश्न त्यांनी लोकसभा सभागृहातील उपस्थितांना विचारला. तसेच ते चंदाजीवी संघटनेचे सदस्य नाहीत का? असा खोचक टोलाही त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींना लगावला आहे. 

VIDEO - प्रशिक्षित श्वान शोधणार कोरोनाचे रुग्ण; लष्कराने घेतली चाचणी

MSP फक्त मोदींच्या भाषणात
यादव पुढे म्हणाले, नव्या कृषी कायद्यांबाबत बोलताना पंतप्रधानांनी एमएसपी होती, आहे आणि राहणार असं वक्तव्य केलं होतं. पण ते फक्त त्यांच्या भाषणातच आहे. वास्तवात एमएसपी शेतकऱ्यांना मिळत नाही. जर एमएसपी मिळत असती तर दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत बसले नसते. नव्या कृषी कायद्याने शेतकऱ्यांना जागं केलं असून ते आता आंदोलन करत आहेत. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन. शेतकऱ्यांनी कायदे स्वीकारले नाहीत, तरी सरकार कायदे का मागे घेत नाही, असा सवालही यादव यांनी यावेळी उपस्थित केला. 

सुशांतच्या भावाला मंत्रिपद; नितीशकुमारांची मोठी खेळी​

देशाला स्वातंत्र्य मिळालं ते आंदोलनातूनच!
तसेच आंदोलनातूनच देशाला स्वातंत्र्य मिळालं असल्याची आठवणही यादव यांनी पंतप्रधानांना करून दिली. आंदोलनातूनच महिलांना मतदानाचा हक्क मिळाला, आफ्रिकेत केलेल्या आंदोलनामुळेच महात्मा गांधी जगभरात ओळखले जाऊ लागले, अशा उदाहरणांचा दाखलाही यादव यांनी यावेळी दिला. सरकार कॉर्पोरेट क्षेत्रासाठी रेड कार्पेट टाकत आहे, असा आरोपही त्यांनी सरकारवर केला आहे. 

Valentine Special: 'फिल माय लव्ह', आर्याची जादू आजही कायम!​

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यसभेत चर्चेला उत्तर देताना विरोधकांवर निशाणा साधला होता. देशात एक नवीन गट जन्माला आला आहे, जो आंदोलनाशिवाय जगू शकत नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. त्यावरून बरंच वादळ उठलं आहे.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image