
सासवड (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुंरदर तालुक्यात सध्या अफवांचे जोरदार पीक आले आहे. सासवड शहर बंद राहणार असल्याची अफवा पसरली होती. याबाबत तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी सांगितले की, सासवड शहर बंद वा सील करणार नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका.
कोविड विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून पुरंदर तालुक्यात प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात आलेले आहेत. तसेच, तालुक्यात एकूण 26 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेले असून, त्यापैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 9 रुग्णांना घरी सोडण्यात आलेले आहेत. उर्वरित 14 कोरोनाग्रस्त रुग्ण हे पुण्यात हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
फिजीकल डिस्टंन्सिंगचा फज्जा
पुरंदर तालुक्यात कोरोना परसरत असताना तालुक्याच्या मुख्य ठिकाणी म्हणजेच सासवड शहरातील बाजारपेठेत मात्र फिजीकल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडत आहे. भाजी बाजारात तर गर्दीवर नियंत्रणच राहत नाही. पुणे शहर सासवडला जवळ असल्याने धोका उंबरठ्यावर नव्हे, तर घरात आला आहे. त्यामुळे ठराविक दिवसांनी जनता कर्फ्यु न पाळल्यास परिस्थिती हातभार जाण्याची चिन्हे आहेत.
सासवडला आज आठवडे बाजार होता. त्यामुळे गर्दी होती. पण, रोजच बाजारपेठ भरभरून वाहत असते. बहुतांश दुकानात फिजीकल डिस्टंन्सिंग पाळली जात नाही. सॅनेटायझर तर अभावाने दुकानदार वापरतात. कित्येकजण मास्क नीट वापरत नाहीत. त्यातून शहरात कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. हा धोका बाजारपेठेतील गर्दी आणि मुंबई व पुणे कनेक्शनमधून वाढत आहे. त्यासाठी पुन्हा नव्याने प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून लोकसहभाग घेऊन नियोजन करणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.