मुठा नदीत मगर असल्याची पुण्यात चर्चा  

राजेंद्रकृष्ण कापसे 
बुधवार, 10 जुलै 2019

शिवणे (पुणे): शिवणे नांदेड पुलावर मुठा नदीत एका व्यक्तीने मगर पाहिली अशी चर्चा खडकवासला परिसरात रंगली आहे. त्यात नांदेड ग्रामपंचायतीने सावधानेचा इशारा देणारे पत्र काढले त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली. दरम्यान सरपंचाच्या विनंती वरून वनविभागाने परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी मगरी दिसली नाही किंवा तिच्या अस्तित्वाबद्दल कोणताही पुरावा मिळाला नाही. मगर नव्हती तर तो कोणता प्राणी होता याची चर्चा खडकवासला परिसरात रंगली आहे.

शिवणे येथे मधुकर शिवतारे हे एका क्लासचे व्यवस्थापक आहेत. कामावर जाण्यासाठी मंगळवारी धायरीकडे जात होते. सकाळी पाऊस असल्याने त्यांनी मोबाइल भिजू नये म्हणून खिशात ठेवला नव्हता. शिवणे नांदेड पुलावरून सकाळी साडेसहा वाजता दुचाकीने निघालेले होते. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या शेपटीचा भाग दिसला. सुरवातीला त्यांना साप असावा असे वाटले. परंतु शेपटी सापासारखी नाही हे लक्षात आल्यावर ते थांबले. मगरी सारखी शेपटी त्यांना वाटली. 

पाठीमागून मोठी गाडी आली. तिच्या आवाजाने ती पाण्यात गेली. त्यानंतर ते पुढे नांदेडला गेले. तेथे त्यांनी ओळखीच्या दुकानदाराला ही माहिती दिली. असे शिवतारे यांनी सकाळशी बोलताना सांगितले. त्या दुकानदाराने ही माहिती ग्रामपंचायतीला दिली. गावात अनेक जण मासे पकडण्यासाठी नदीत जात असतात. त्यामुळे, ग्रामपंचायतीने खबरदारी म्हणून पत्र काढले. 
याबाबत, वन परिक्षेत्र अधिकारी दीपक पवार व खडकवासला धरणाचे शाखा अभियंता राजकुमार क्षीरसागर यांनी सांगितले. "खडकवासला धरण, किंवा मुठा नदीत मागील तीन चार वर्षात मगर दिसल्याचे माहिती नाही. त्यामुळे, मगर असण्याबाबत शंका वाटते."

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rumors of crocodile in mutha river near Nanded bridger