Pune Fraud News : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ६२ लाखांची फसवणूक

शेअर बाजारातील दलाल असल्याचे सांगत त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष फिर्यादीला दाखविले.
Fraud
Fraudsakal
Updated on

पुणे - शेअर बाजारात गुंतवणुक केल्यास जादा नफा मिळेल, असे अमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका महिलेसह दोघांची ६२ लाख रूपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर व बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर येथील ४६ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर मार्च महिन्यात अनोळखी व्यक्तींनी संपर्क साधला.

शेअर बाजारातील दलाल असल्याचे सांगत त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष फिर्यादीला दाखविले. त्यांना प्रतिसाद देत महिलेने पैसे गुंतविले. त्यानुसार, प्रारंभी त्यांना चांगला परतावा देण्यात आल्याने फिर्यादीचा त्यांच्यावर विश्वास बसला.

त्यानंतर सायबर फिर्यादी महिलेस जादा रक्कम गुंतविण्यास सांगितली, त्यानुसार फिर्यादीने एका महिन्यात सायबर चोरट्यांच्या बॅंक खात्यात वेळावेळी ३१ लाख ६० हजार रुपये जमा केले. वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद व परतावा मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

दरम्यान, बाणेर परिसरातील ६३ वर्षीय नागरिकाची देखल सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. बाणेर भागातील एका सोसायटीत ज्येष्ठ नागरिक राहतात. शेअर बाजारात गुंतवणुक केल्यास जादा परतावा मिळले, असे आमिष चोरट्यांनी दाखविले होते.

त्यानुसार, त्यांनी वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात ३१ लाख २० हजार रुपये जमा केले. त्यांनाही परतावा मिळाल नाही, त्यानंतर फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com