
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाचं निधन झाल्याच्या घटनेनं कुटुंब शोकसागरात बुडालंय. रुपाली चाकणकर यांचे मावसभाऊ बाळराजे माळी यांचं निधन झालं. रक्षाबंधनादिवशीच भावाच्या निधनानंतर चाकणकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून श्रद्धांजली वाहिलीय.