

rupali thombare
sakal
Pune: नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. विशेष तपास पथकाच्या (SIT) प्रमुख आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना त्यांनी लक्ष्य केले आहे. सातपुते यांच्या बदल्या अशोक खरातच्या माध्यमातून होत असल्याचे चाकणकर सांगायच्या. तसेच चाकणकर यांच्या सांगण्यावरून सातपुते यांनी पुण्यात असताना खोटे गुन्हे दाखल केल्याचा दावाही ठोंबरे यांनी केला आहे.