Rupali Thombare: "मासे खाऊन डोळे..." या वादग्रस्त विधानावरुन रुपाली ठोंबरेंचा गावितांवर निशाणा; म्हणाल्या...

गावित यांनी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हीचा देखील उल्लेख केला आहे.
rupali patil thombare
rupali patil thombareesakal

पुणे : राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी मासे खाणाऱ्या महिलांबाबत एक वादग्रस्त विधान केल्यानं ते आज दिवसभर चर्चेत राहिले. या विधानवरुन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली. या मुद्द्यावरुनच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी देखील गावितांवर निशाणा साधला आहे. (Rupali Thombare slams of VijayKumar Gavit for her controversial statement on women who eats fish)

रुपाली ठोंबरे म्हणाल्या, "लोकप्रतिनिधी गावितांनी जरा भानावर राहून बोलावं, लोकप्रतिनिधींना भान असलंच पाहिजे मासे खाऊन डोळे सुंदर होतात, पटवण्यात येतात, यापेक्षा आपल्या समाजातील माता, भगिनी सक्षम, सुरक्षित कशा राहतील यावर बोलावं तसं काम करावं. बेताल, भान नसलेल्या लोकप्रतिनिधीचा धिक्कार आहे. शेम ऑन गावित" (Latest Marathi News)

rupali patil thombare
Buldhana Police Death: तीन वर्षांच्या मुलीसह पोलीस पत्नीचा खून करुन पतीचा गळफास; बुलडाण्यातील थरारक घटना

गावीत यांनी नेमकं काय म्हटलंय?

आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. "मासे खाणारे बाईमाणूस चिकने दिसायला लागतात. त्यांचे डोळे पण तरतरीत दिसतात, कोणीही बघितलं तरी पटवूनच घेणार. तुम्ही ऐश्वर्या रॉय बघितली ना? ऐश्वर्या मंगळुरूमध्ये समुद्र किनारी राहायची ती दररोज मासे खायची. बघितले ना तिचे डोळे तसे तुमचे पण होऊन जातील" (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com