Loksabha 2019 : रुपी बँकेचे खातेदार, ठेवीदार निवडणुकीत "नोटा' वापरणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

पुणे : आर्थिक अडचणीत आल्याने बंद पडलेली रुपी बँक पुन्हा सुरू करण्यासाठी राजकीय पक्षांतील नेते आणि मंत्री यांच्याकडे गेली सहा वर्षे पाठपुरावा करत आहोत. मात्र बँक सुरू करण्याची त्यांची इच्छाशक्ती नसल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये बँकेचे खातेधारक आणि ठेवीदार 'नोटा'ला मतदान करणार असल्याचे रुपी बँक खातेधारक आणि ठेवीदार संघटनेचे धनंजय खांजोडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. 

रुपी बँकेवर 413 कोटी कर्ज झाल्याने भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) फेब्रुवारी 2013 मध्ये बँकेवर बंदी आणली होती. ती उठविण्यासाठी सरकारने बँकेला कर्ज द्यावे, याबाबत सर्व पक्षांतील नेत्यांशी चर्चा केली असून, कोणीही बँक सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. यामुळे येत्या निवडणुकीत 'नोटा'चा वापर करण्याचा निर्णय संघटनेने घेतल्याचे खांजोडे यांनी सांगितले. 

राज्यातील सुमारे सहा लाख 22 हजार खातेदारांचे आणि ठेवीदारांचे सुमारे एक हजार 313 कोटी रुपये बँकेत गुंतलेले आहेत; तसेच कर्जबुडव्यांची संपत्ती अल्प किमतीला विकल्याने बँकेवर झालेले 413 कोटींचे कर्ज फेडण्यासाठी "आरबीआय'ने कर्ज बुडवणाऱ्यांची संपत्ती ताब्यात घेऊन ती योग्य भावामध्ये विकावी, जेणेकरून बँक कर्जातून मुक्त होईल, अशी मागणी या वेळी संघटनेने केली. संघटनेचे रमेश पाटील, मनीष नारायणे, बाबासाहेब ढवळी, स्नेहल कोरहल्ली आदी उपस्थित होते. 
 
Web Title: Rupee bank account holders, Depositors will use "Nota" in elections