‘रुपी’प्रकरणी लवकरच बैठक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

पुणे - रुपी बॅंकेच्या विलीनीकरणासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसमवेत लवकरच चर्चा केली जाणार आहे. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची रुपी बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाच्या शिष्टमंडळासोबत नुकतीच चर्चा झाली. या वेळी त्यांनी हे आश्‍वासन दिल्याचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुधीर पंडित यांनी सांगितले.

एका खासगी कार्यक्रमासाठी देशमुख  पुण्यात आले होते. या वेळी त्यांना पंडित यांच्यासह सदस्य डॉ. अच्युत हिरवे आणि बॅंकेचे सरव्यवस्थापक नितीन लोखंडे यांच्या शिष्टमंडळाने भेटून बॅंकेची सद्यःस्थिती आणि विलीनीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. या संदर्भातील लेखी निवेदनदेखील देण्यात आले. दरम्यान, रुपीचे ठेवीदार, प्रशासकीय मंडळ, राज्य सरकार आणि आरबीआयच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्याची विनंती या वेळी करण्यात आली. यावर मंत्री देशमुख यांनी सकारात्मकता दाखवली.

Web Title: rupee bank merger